आतां श्राद्धांत विश्वेदेव सांगतो -
अथविश्वेदेवाः हेमाद्रौशंखबृहस्पती इष्टिश्राद्धेक्रतूदक्षौसत्यौनांदीमुखेवसू नैमित्तिकेकामकालौकाम्येचधुरिलोचनौ पुरुरवार्द्रवौचैवपार्वणेसमुदाह्यतौ तत्रैव उत्पत्तिंनामचैतेषांनविदुर्येद्विजातयः अयमुच्चारणीयस्तैः श्लोकः श्रद्धासमन्वितैः आगच्छंतुमहाभागाविश्वेदेवामहाबलाः येअत्रविहिताः श्राद्धेसावधानाभवंतुते इति इष्टिश्राद्धंश्राद्धंप्रतिरुचिरित्युक्तमितिकल्पतरुः आधानादिकर्मांगमित्यन्ये नैमित्तिकमेकोद्दिष्टम् एकोद्दिष्टंतुयच्छ्राद्धंतन्नैमित्तिकमुच्यते इतिभविष्योक्तेः एतद्यद्यपि एकोद्दिष्टंदैवहीनमितितत्रविश्वेदेवनिषेधस्तथापिनवश्राद्धेद्वादशमासिकेचकामकालौज्ञेयौ नवश्राद्धंदशाहानिनवमिश्रंतुषडऋतून् अतः परंपुराणंवैत्रिविधं श्राद्धमुच्यते यस्मिन्नवेपुराणेवाविश्वेदेवानलेभिरे आसुरंतद्भवेच्छ्राद्धंवृषलंमंत्रवर्जितमितिबह्वृचपरिशिष्टात् एतच्चबह्वृचानामेव तेषामेवोक्तेः अन्येषांतुनात्रविश्वेदेवाइतिकात्यायनोक्तेस्तन्निषेधएवेतिपृथ्वीचंद्रोदयः अन्येतुनैमित्तिकंसपिंडीकरणमाहुः भविष्ये यद्यप्येकोद्दिष्टंतच्छब्देनोक्तंतथापि तदप्यदैवंकर्तव्यमयुग्मान् भोजयेद्दिजानितितत्रैवविश्वेदेवनिषेधात् यद्यपिसपिंडीकरणेंशतएकोद्दिष्टत्वंतथापि सपिंडीकरणश्राद्धंदेवपूर्वंनियोजयेदितिवचनात्तत्परत्वम् हेमाद्रावादित्यपुराणे विश्वेदेवौक्रतुर्दक्षः सर्वास्विष्टिषुकीर्तितौ नित्येनांदीमुखेश्राद्धेवसूसत्यौचपैतृके नवान्नलंभनेदेवौकामकालौसदैवहि अपिकन्यागतेसूर्येकाम्येचधुरिलोचनौ पुरुरवार्द्रवौचैवविश्वेदेवौतुपार्वणे क्कचिद्विश्वेदेवापवादमाहहेमाद्रौशातातपः नित्यंश्राद्धमदैवंस्यादेकोद्दिष्टंतथैवच मातुः श्राद्धंचयुग्मैः स्याददैवंप्राड्मुखैः पृथक् योजयेद्देवपूर्वाणिश्राद्धान्यन्यानियत्नतः नांदीश्राद्धेभिन्नप्रयोगपक्षेमातुः श्राद्धमदैवमितिहेमाद्रिः ।
हेमाद्रींत शंख व बृहस्पति - " इष्टिश्राद्धांत क्रतुदक्ष , नांदीश्राद्धांत सत्यवसु , नैमित्तिकश्राद्धांत कामकाल , काम्यश्राद्धांत धुरिलोचन , पार्वणश्राद्धांत पुरुरवार्द्रव याप्रमाणें विश्वेदेव होत . " तेथेंच सांगतो - ‘‘ ज्या ब्राह्मणांना या विश्वेदेवांची उत्पत्ति व नांव कळत नाहीं त्यांनीं श्रद्धायुक्त होऊन हा ( पुढील ) श्लोक म्हणावा " तो असा - " आगच्छंतु महाभागा विश्वेदेवा महाबलाः ॥ ये अत्र विहिताः श्राद्धे सावधाना भवंतु ते ॥ " वरील वचनांत इष्टिश्राद्ध म्हणजे श्राद्धकालप्रकरणीं ‘ श्राद्धं प्रति रुचिश्चैव ’ या वचनानें विहित श्राद्ध तें समजावें , असें कल्पतरु सांगतो . आधानादिकांत कर्मांग जें श्राद्ध तें इष्टिश्राद्ध असें अन्य म्हणतात . नैमित्तिकश्राद्ध म्हणजे एकोद्दिष्ट होय . कारण , " जें एकोद्दिष्ट श्राद्ध तें नैमित्तिक म्हटलें आहे " असें भविष्यवचन आहे . जरी " एकोद्दिष्ट दैवहीन करावें " या वचनानें एकोद्दिष्टांत विश्वेदेवांचा निषेध केला आहे , तथापि नवश्राद्ध आणि द्वादशमासिकें या ठिकाणीं कामकाल विश्वेदेव समजावे . " दशाहांत करावयाचें श्राद्ध तें नवश्राद्ध , एकवर्षपर्यंत करावयाचें श्राद्ध तें नवमिश्र आणि वर्षानंतर करावयाचें तें पुराण याप्रमाणें तीन प्रकारचें श्राद्ध सांगितलें आहे . ज्या नवश्राद्धांत किंवा पुराणश्राद्धांत विश्वेदेवांना भाग मिळाला नाहीं तें श्राद्ध आसुर ( दैत्यांना प्रापक ) असें मंत्रवर्जित शूद्रतुल्य होतें " असें बह्वृचपरिशिष्टवचन आहे . हा प्रकार ( नवश्राद्धांत विश्वेदेव असणें ) बह्वृचांनाच लागू आहे . कारण , त्यांनाच सांगितले आहेत , इतरांस तर " या ठिकाणीं विश्वेदेव नाहींत " या कात्यायनवचनानें विश्वेदेवांचा निषेधच आहे असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो . दुसरे ग्रंथकार तर नैमित्तिक म्हणजे सपिंडीकरण श्राद्ध , असें सांगतात . जसे भविष्यवचनांत तच्छब्दानें एकोद्दिष्ट सांगितलें तथापि " तें एकोद्दिष्टही देवरहित करावें , अयुग्म ( १।३ ) अशा ब्राह्मणांना भोजन घालावें " या वचनानें त्याच ठिकाणीं विश्वेदेवांचा निषेध केला आहे . जरी सपिंडीकरणश्राद्ध अंशानें एकोद्दिष्ट आहे , म्हणून त्या ठिकाणीं विश्वेदेवांचा निषेध प्राप्त झाला , तरी " सपिंडीकरण श्राद्ध देवपूर्वक करावें " ह्या वचनानें तें विश्वेदेवयुक्त आहे . हेमाद्रींत आदित्यपुराणांत - " सर्व इष्टिश्राद्धांत क्रतुदक्ष हे विश्वेदेव , नांदीश्राद्धांत सत्यवसु , नवश्राद्धांत कामकाल , सूर्य कन्याराशिस्थ असतां जें महालय श्राद्ध व इतर काम्यश्राद्ध त्यांत धुरिलोचन , आणि पार्वणश्राद्धांत पुरुरवार्द्रव विश्वेदेव होत . " क्कचित्स्थलीं विश्वेदेवांचा अपवाद सांगतो हेमाद्रींत शातातप - " नित्यश्राद्ध देवरहित करावें , तसेंच एकोद्दिष्ट ( सपिंडीकरणाच्या पूर्वीं होणारें तें ) देवरहित होय . मातृश्राद्ध देवरहित आहे तें वेगळे दोन ब्राह्मण प्राड्मुख बसवून करावें , इतर श्राद्धें देवपूर्वक करावीं . " वरील वचनांत मातृश्राद्ध देवरहित सांगितलें तें नांदीश्राद्धाचा भिन्नप्रयोग करावयाचा त्यापक्षीं समजावें असें हेमाद्रि सांगतो . इति श्राद्धदेवतानिर्णय .