आतां अतिक्रांत आशौच सांगतो -
अथातिक्रांताशौचं तत्राशौचमध्येजननादौज्ञातेतच्छेषेणशुद्धिः विगतंतुविदेशस्थंश्रृणुयाद्योह्यनिर्दशं यच्छेषंदशरात्रस्यतावदेवाशुचिर्भवेदितिमनूक्तेः अत्रकेचिदेतत्पुत्रातिरिक्तविषयं तेषांत्वाशौचमध्येश्रवणेपितदाद्येवदशाहादि पितरौचेन्मृतौस्यातांदूरस्थोपिहिपुत्रकः श्रुत्वातद्दिनमारभ्यदशाहंसूतकीभवेदित्यस्यसर्वापवादत्वादित्याहुः तन्न ज्ञातमरणस्यनिमित्तत्वात् अनग्निमतउत्क्रांतेरित्यादिविरोधाच्च स्मृत्यर्थसारेपि जननेमरणेवाप्रथमदिनादूर्ध्वंज्ञातेपुत्रादीनांशेषेणैवशुद्धिरिति षडशीतावपरार्केचैवं दशाहादूर्ध्वंज्ञातेतुवृद्धवसिष्ठः मासत्रयेत्रिरात्रंस्यात्षण्मासेपक्षिणीतथा अहस्तुनवमादर्वागूर्ध्वंस्नानेनशुध्यति जननेत्वतिक्रांताशौचंनास्त्येव नाशुद्धिः प्रसवाशौचेव्यतीतेषुदिनेष्वपीतिदेवलोक्तेः पितुः स्नानंतत्रापिभवत्येव निर्दशंज्ञातिमरणंश्रुत्वापुत्रस्यजन्मच सवासाजलमाप्लुत्यशुद्धोभवतिमानवइतिमनूक्तेः तच्चातिक्रांताशौचंदशाहादिजात्याशौचविषयं नत्वनुपनीतादिनिमित्तत्रिरात्रादौ उपनीतेतुविषमंतस्मिन्नेवातिकालजमितिव्याघ्रोक्तेः निर्दशंज्ञातिमरणं अतिक्रांतेदशाहेत्वितिमनूक्तेश्च माधवीयेदेवलस्तु आत्रिपक्षात्रिरात्रंस्यात्षण्मासात्पक्षिणीततः परमेकाहमावर्षादूर्ध्वंस्नातोविशुध्यतीत्याह तत्रापदनापद्विषयत्वेनव्यवस्था इदंचैकदेशे ।
जननाशौच व मृताशौच उत्पन्न होऊन तें दहा दिवसांचे आंत समजलें तर आशौचाचे जितके दिवस राहिले असतील तितक्या दिवसांनीं शुद्धि होते . कारण , " परदेशांत मृतसपिंडाला जो दहा दिवसांचे आंत श्रवण करील त्याला दहा दिवसांचे शेष दिवस जितके असतील तितकेच दिवस आशौच होतें " असें मनुवचन आहे . येथें केचित् ग्रंथकार - हें वचन पुत्रातिरिक्ताविषयीं आहे . पुत्रांना तर आशौचामध्यें ( दहा दिवसांचे आंत ) जरी मातापितृमरण ऐकूं आलें तरी त्या ऐकिलेल्या दिवसापासूनच दशाह आशौच वगैरे समजावें . कारण , " आईबाप मृत झाले आणि पुत्र दूर देशीं आहे तरी श्रुत झालेल्या दिवसापासून दहा दिवस आशौच धरावें " हें वचन सर्व वचनांचा अपवाद ( बाधक ) आहे , असें सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , जाणलेलें मरण आशौचाविषयीं निमित्त आहे . हें जाणलेलें मरण दहा दिवसांनंतरही असतें , म्हणून दुसरा हेतु सांगतो - " परदेशांत अग्निरहित मृत असतां त्याचें आशौचादिक प्राणोत्क्रमणापासून समजावें . " ह्या वर सांगितलेल्या पैठीनसिस्मृति इत्यादिकांचा विरोधही येतो . स्मृत्यर्थसारांतही - जनन किंवा मरण प्रथम दिवसाच्या पुढें समजलें असतां पुत्रादिकांची शेषदिवसांनींच शुद्धि होते . षडशीतींत व अपरार्कांतही असेंच आहे . दहा दिवस होऊन गेल्यावर समजलें तर सांगतो वृद्धवसिष्ठ - " तीन महिन्यांचे आंत समजलें असतां तीन दिवस . सहा महिन्यांच्या आंत समजलें असतां पक्षिणी . नऊ महिन्यांच्या आंत समजलें तर एक दिवस . नऊ महिने होऊन गेल्यावर समजेल तर स्नानानें शुद्ध होतो . " जननाशौचाविषयीं तर अतिक्रांत आशौच नाहींच . कारण , " जननाशौचाचे दिवस गेल्यावर आशौच नाहीं " असें देवलवचन आहे . तें जननाशौच अतिक्रांत असलें तरी पित्याला स्नान सांगितलें आहेच . कारण , " दहा दिवस होऊन गेल्यावर ज्ञातीचें ( सपिंडाचें ) मरण समजलें व दहा दिवस झाल्यावर पुत्राचें जन्म समजलें तर वस्त्रासहित स्नान करुन मनुष्य शुद्ध होतो " असें मनुवचन आहे . तें अतिक्रांताशौच दशाहादिक जातीच्या आशौचाविषयीं समजावें . उपनयनादिक नसलेल्या निमित्तानें प्राप्त झालेलें जें त्रिरात्र - एकरात्र इत्यादि आशौच त्याविषयीं अतिक्रांताशौच नाहीं . कारण , " उपनयन झालेला मृत असतां त्याच्याचविषयीं वर्णनिमित्त विषमाशौच व अतिक्रांताशौच आहे " असें व्याघ्रवचन आहे . आणि " ज्ञातिमरण दहा दिवसांनंतर समजलें असतां वस्त्रसहित स्नान करुन मनुष्य शुद्ध होतो " हें वर सांगितलेलें , तसेंच " दहा दिवस अतिक्रांत असतां० " असें मनुवचनही आहे . माधवीयांत देवल तर - " दहा दिवसांनंतर तीन पक्षांचे आंत समजेल तर तीन दिवस . सहा महिन्यांच्या आंत समजेल तर पक्षिणी . सहा महिन्यांच्या पुढें वर्षाच्या आंत समजेल तर एक दिवस . वर्षानंतर समजेल तर स्नान करुन शुद्ध होतो " असें सांगतो . या वचनांत तीन पक्षांनंतर पक्षिणी व पूर्वींच्या वृद्धवसिष्ठवचनांत तीन महिन्यांनंतर पक्षिणी सांगितलें . तसेंच या वचनांत वर्षापर्यंत एक दिवस . व पूर्वींच्या वृद्धवसिष्ठवचनांत नवममासानंतर स्नान सांगितलें त्यांमध्यें आपत्काल व अनापत्काल पाहून व्यवस्था करावी . हें त्रिरात्रादि आशौच एकदेशीं मृताचें समजावें .
देशांतरेतुस्नानमात्रं देशांतरमृतंश्रुत्वाक्लीबेवैखानसेयतौ मृतेस्नानेनशुध्यंतिगर्भस्त्रावेचगोत्रिणइति पराशरोक्तेरितिविज्ञानेश्वरः स्नानंवत्सरांते अर्वाक् त्रिपक्षात्रिनिशंषण्मासाच्चदिवानिशं अहः संवत्सरादर्वाग्देशांतरमृतेष्वपीतिविष्णूक्तेरितिमाधवः इदंसपिंडानां देशांतरेस्नानंसोदकानामितियुक्तं लक्षणंत्वाहबृहस्पतिः महानद्यंतरंयत्रगिरिर्वाव्यवधायकः वाचोयत्रविभिद्यंतेतद्देशांतरमुच्यते देशांतरंवदंत्येकेषष्टियोजनमायतं चत्वारिंशद्वदंत्यन्येत्रिंशदन्येतथैवचेति एतत्सर्वंमातापितृभिन्नविषयं तयोस्तु पितरौचेदितिपूर्वपैठीनसिवाक्यात्सदापूर्णमेवदशाहादि स्मृत्यर्थसारेपि मातापितृमरणेदूरदेशेपिसंवत्सरोर्ध्वमपिपुत्रोदशाहादिकंपूर्णमाशौचंकुर्यात् स्त्रीपुंसयोः परस्परंसपत्नीषुचैवमिति शुद्धितत्त्वादयोगौडास्तु ऊर्ध्वसंवत्सरादाद्याद्बंधुश्चेच्छ्रूयतेमृतः भवेदेकाहमेवात्रतच्चसंन्यासिनांनत्वितिदेवलोक्तेः पित्रोरब्दमध्येत्रिरात्रमूर्ध्वमेकाहः बंधुर्मातापिताभर्ताच पूर्वोक्तदशाहस्तुकलिंगादिदेशपरइत्याहुः तेबंधुपदस्यपित्रादिपरत्वेमानाभावादुपेक्ष्याः सापत्नमातुस्तुदक्षः पितृपत्न्यामपेतायांमातृवर्जंद्विजोत्तमः संवत्सरेव्यतीतेपित्रिरात्रमशुचिर्भवेत् हीनवर्णमातृषुसपत्नीषुचैवमितिस्मृत्यर्थसारे केचित् पितुः पत्न्यांप्रमीतायामौरसेतनयेतथेति ब्राह्मोक्तेस्त्वौरसेपीदमाहुः षडशीतावप्येवं एतत्सर्ववर्णतुल्यं तुल्यंवयसिसर्वेषामतिक्रांतेतथैवचेति व्याघ्रोक्तेः ।
देशांतरीं मृत असतां दहा दिवसांनंतर समजेल तर स्नान मात्र आहे . कारण , " देशांतरीं सपिंड मृत झालेला समजलें असतां ; व नपुंसक , वैखानस , संन्याशी हे मृत झाले असतां त्यांचे गोत्रज स्नान करुन शुद्ध होतात . आणि गर्भस्त्राव झाला असतां गोत्रज स्नानानें शुद्ध होतात " असें पराशरवचन आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . देशांतरीं मृत असला तरी वर्षानंतर स्नान . कारण , " तीन पक्षांच्या आंत समजेल तर तीन दिवस ; सहा महिन्यांच्या आंत दिवसरात्र ; वर्षाच्या आंत एक दिवस ; हें देशांतरी मृतांविषयीं देखील समजावें " असें विष्णुवचन आहे , असें माधव सांगतो . हें माधवानें सांगितलेलें सपिंडांना समजावें . देशांतरीं मृत असतां समानोदकांना ( आठव्यापासून पुढच्यांना ) स्नान हें युक्त आहे . देशांतराचें लक्षण सांगतो बृहस्पति - " महानदी किंवा मोठा पर्वत मध्यें असून भाषेच्या ज्या ठिकाणीं भेद होतो , तें देशांतर म्हटलें आहे . साठ योजनें ( २४० कोश ) दूर झालें म्हणजे देशांतर , असें कितीएक म्हणतात . इतर विद्वान् चाळीस योजनें दूर म्हणजे देशांतर म्हणतात . दुसरे विद्वान् तीस योजनें दूर असलें म्हणजे देशांतर म्हणतात . " तीन दिवस आशौच सांगितलें हें सारें मातापिता यांहून इतरांविषयीं आहे . माता व पिता यांचें तर " जर मातापिता मृत असून पुत्र दूर असला तरी श्रुत झालेल्या दिवसापासून दहा दिवस सूतक धरावें " या पूर्वीं सांगितलेल्या पैठीनसिवचनावरुन सर्वदा ( कालांतरीं देखील ) संपूर्णच दशाहादि आशौच समजावें . स्मृत्यर्थसारांतही - माता व पिता मृत असतां पुत्र दूर देशीं असला तरी वर्षानंतर समजलें तरी त्यानें दशाहादिक पूर्ण आशौच करावें . याचप्रमाणें पतीचें स्त्रियेनें व स्त्रियेचें पतीनें आणि सवतीनें सवतीचें देशांतरीं व कालांतरींही पूर्ण दशाहादि आशौच करावें , असें सांगितलें आहे . शुद्धितत्त्व इत्यादि गौडग्रंथ तर - " बंधु मृत झालेला एक वर्ष होऊन गेल्यावर जर समजेल तर त्याचें आशौच एक दिवसच होतें . तें संन्याशांना नाहीं . " ह्या देवलवचनावरुन मातापितरांचें वर्षाच्या आंत तीन दिवस . वर्षानंतर एक दिवस . या वचनांत बंधु म्हणजे माता , पिता व भर्ता समजावा . पूर्वीं सांगितलेलें दशाह आशौच तर कलिंग इत्यादि देशाविषयीं समजावें , असें सांगतात . तेथें बंधु या पदाचा माता पिता इत्यादि अर्थ करण्याविषयीं प्रमाण नसल्यामुळें त्यांचें तें मत उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . सापत्न मातेला तर सांगतो दक्ष - " माता वर्ज्य करुन दुसरी बापाची पत्नी मृत असतां एक वर्ष होऊन गेल्यावर समजलें तरी तीन दिवस आशौच धरावें . " आपल्यापेक्षां कमी जातीच्या माता व सवती यांविषयीं देखील असेंच समजावें , असें स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे . केचित् ग्रंथकार - " बापाची पत्नी मृत असतां , तसाच औरस पुत्र मृत असतां " ह्या ब्राह्मवचनावरुन औरस पुत्राचें देखील असें समजावें , असें सांगतात . षडशीतींतही असेंच आहे . हें अतिक्रांताशौच ब्राह्मणादि चारी वर्णांना समान आहे . कारण , " वयोनिमित्तक आशौच आणि अतिक्रांत आशौच हें सर्व वर्णांना समान आहे " असें व्याघ्रवचन आहे .