आतां क्षयाह ( मृततिथि ) दोन दिवशीं असतां निर्णय सांगतो -
अथक्षयाहद्वैधेनिर्णयः तत्रैकोद्दिष्टंमध्याह्नेकार्यं मध्याह्नश्चपंचधाविभक्तदिनतृतीयभागइतिमाधवः आमश्राद्धंतुपूर्वाह्णेएकोद्दिष्टंतुमध्यमे पार्वणंचापराह्णेतुप्रातर्वृद्धिनिमित्तकमिति हारीतोक्तौप्रातः शब्द साहचर्यात् तत्रापिकुतपादिषुमुहूर्तद्वितयेज्ञेयं प्रारभ्यकुतपेश्राद्धंकुर्यादारौहिणंबुधः विधिज्ञोविधिमास्थायरौहिणंतुनलंघयेदितिगौतमोक्तेरेतत् परत्वात् रौहिणोनवमोमुहूर्तः मैथिलाः श्राद्धकौमुदीचैवम् अन्यथा ऊर्ध्वंमुहूर्तात्कुतपाद्यन्मुहूर्तचतुष्टयं मुहूर्तपंचकंह्येतत्स्वधाभवनमिष्यतइत्यादिविरोधात् दीपिकापि एकोद्दिष्टमुपक्रमेतकुतपइति माधवीयेव्यासोपि कुतपप्रथमेभागेएकोद्दिष्टमुपक्रमेत् आवर्तनसमीपेवातत्रैवनियतात्मवान् पृथ्वीचंद्रोदयेप्येवं तेनकुतपादिरौहिणांतोमुख्यः कालः दिनद्वयेतव्द्याप्तौसमव्याप्तौचपूर्वा विषमव्याप्तावाधिक्येननिर्णयः अव्याप्तौपूर्वैव परविद्धायानिषेधात् साचपूर्वदिनेरौहिणलंघनापत्तेः परैवेतिगौडाः शुक्लकृष्णवशात् खर्वदर्पाद्यैर्वाव्यवस्थेत्यन्ये तन्न परविद्धानिषेधप्राबल्यात् अत्रमूलंकालमाधवीयेज्ञेयं ।
त्यांत एकोद्दिष्ट मध्याह्नीं करावें . मध्याह्न म्हणजे दिवसाचे पांच भाग करुन त्यांतील तिसरा भाग होय , असें माधव सांगतो . कारण , " आमश्राद्ध पूर्वाह्णीं , एकोद्दिष्ट मध्याह्नीं , पार्वण अपराह्णीं आणि वृद्धिनिमित्तक श्राद्ध प्रातः कालीं करावें . " या हारीतवचनांत ‘ प्रातः ’ हा शब्द आहे त्याच्याबरोबर असलेला मध्यमशब्दही तशाच भागाचा वाचक आहे . त्या मध्याह्नांतही कुतप व रौहिण या दोन मुहूर्तांत करावें ; कारण , विधि जाणणारानें कुतपावर श्राद्ध आरंभून रौहिणमुहूर्तापर्यंत करावें . रौहिणाचें तर उल्लंघन करुं नये " हें गौतमवचन ह्या एकोद्दिष्टविषयक आहे . आठवा मुहूर्त कुतप आणि नववा रौहिण . मैथिल व श्राद्धकौमुदीकार हे असेंच ( गौतमवचन एकोद्दिष्टविषयक ) सांगतात . हें वचन एकोद्दिष्टविषयक मानलें नाहीं तर " कुतप व त्याच्या पुढचें चार मुहूर्त मिळून हे पांच मुहूर्त श्राद्धाला इष्ट आहेत " इत्यादि वचनांशीं विरोध येईल . दीपिकाही - " कुतपावर एकोद्दिष्ट आरंभावें . " माधवीयांत व्यासही - " कुतपाच्या पहिल्या भागीं एकोद्दिष्टाचा उपक्रम करावा ; अथवा आवर्तन कालाच्या ( मध्याह्नसंधीच्या ) जवळ कुतपावरच आरंभ करावा . " पृथ्वीचंद्रोदयांतही असेंच आहे . यावरुन कुतपापासून रौहिण आहे तोंपर्यंत एकोद्दिष्टाचा मुख्य काल समजावा . दोन्ही दिवशीं संपूर्ण मुख्यकालव्यापिनी किंवा समव्यापिनी ( तिथि असतां ) पूर्वा घ्यावी . दोन दोन दिवशीं कमीजास्त व्याप्ति असेल तर जी अधिक व्याप्ति असेल ती तिथि घ्यावी . दोन्ही दिवशीं मुख्यकालव्याप्ति नसेल तर पूर्वाच घ्यावी . कारण , परतिथीनें विद्ध तिथि घेऊं नये , असा निषेध आहे . तो पुढें सांगावयाचा आहे . पूर्व दिवसाची घेतली असतां त्या तिथींत श्राद्ध होणें अवश्य आहे म्हणून रौहिणमुहूर्ताचें उल्लंघन होईल , याकरितां पराच घ्यावी , असें गौड सांगतात . शुक्लपक्ष व कृष्णपक्ष यावरुन किंवा खर्च ( साम्य ) व दर्प ( वृद्धि ) इत्यादिकांवरुन व्यवस्था समजावी . असें इतर ग्रंथकार सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , परविद्धानिषेध प्रबळ आहे . याविषयीं मूल कालमाधवीयांत जाणावें .
पार्वणंत्वपराह्णेकार्यं पूर्वोक्तवचनात् मध्याह्नव्यापिनीयास्यात्सैकोद्दिष्टेतिथिर्भवेत् अपराह्णव्यापिनीया पार्वणेसातिथिर्भवेदिति पृथ्वीचंद्रोदयेवृद्धगौतमोक्तेश्च पूर्वेद्युरेवपरेद्युरेववापराह्णव्याप्तौसैवग्राह्या दिनद्वयेतद्व्याप्तौतदस्पर्शेंशतः समव्याप्तौवापूर्वैव विषमव्याप्तौत्वधिकाग्राह्या व्द्यपराह्णव्यापिनीस्यादाब्दिकस्य यदातिथिः महतीयत्रतद्विद्धांप्रशंसंतिमहर्षयइतिमरीचिस्मृतेः दर्शंचपूर्णमांसचपितुः सांवत्सरंदिनं पूर्वविद्धामकुर्वाणोनरकंप्रतिपद्यतइत्यपरार्केनारदोक्तेः व्द्यहेप्यव्यापिनीचेत्स्यान्मृताहस्ययदातिथिः पूर्वविद्धाप्रकर्तव्यात्रिमुहूर्ताभवेद्यदीतिसुमंतूक्तेः पूर्वस्यांनिर्वपेत्पिंडानित्यांगिरसभाषितमितिहेमाद्रौपाठः तत्रैववृद्धमनुः नव्द्यहव्यापिनीचेत्स्यान्मृताहस्यचयातिथिः पूर्वविद्धैवकर्तव्यात्रिमुहूर्ताचयाभवेत् मदनरत्नेप्येवं यत्तु कार्ष्णाजिनिव्यासौ अह्नोस्तमयवेलायांकलामात्रायदातिथिः सैवप्रत्याब्दिकेज्ञेयानापरापुत्रहानिदेतित्रिमुहूर्तस्तुतिः पूर्वेद्युः सायंत्रिमुहूर्ताभावेतुपरैव त्रिमुहूर्तानचेद्ग्राह्यापरैवकुतपेहिसेति कालादर्शेगोभिलोक्तेः कालादर्शेपि प्रत्याब्दिकेप्येवमेवतिथिर्ग्राह्यापराह्णिकी उभयत्रतथात्वेतुमहत्त्वेन विनिर्णयः समत्वेपूर्वविद्धैवह्यतथात्वेपिसायदि त्रिमुहूर्ताभवेत्सायंसर्वेष्टोयंविनिर्णयः अन्यत्रापि सायंतन्यपरत्रचेन्मृततिथिः सैवाब्दिकेमासिकेग्राह्यासाव्द्यपराह्णयोर्यदितदायत्राधिकासामता तुल्याचेदुभयापराह्णसमयेपूर्वानचेत्तुद्वयेपूर्वैवत्रिमुहूर्तगास्तसमयेनोचेत्परैवोचिता ।
पार्वण तर अपराह्णीं करावें . कारण , याविषयीं पूर्वीं सांगितलेलें हारीतवचन आहे . आणि " जी मध्याह्नव्यापिनी ती एकोद्दिष्टाविषयीं तिथि घ्यावी . व जी अपराह्णव्यापिनी ती पार्वणाविषयीं तिथि समजावी " असें पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धगौतमाचें वचनही आहे . पूर्वदिवशींच किंवा परदिवशींच अपराह्णव्याप्ति असतां तीच घ्यावी . दोन दिवशीं संपूर्ण अपराह्णव्याप्ति असतां किंवा मुळींच अपराह्णव्याप्ति नसतां अथवा अंशानें सारखी व्याप्ति असतां पूर्वाच घ्यावी . विषम ( कमीजास्त ) व्याप्ति असतां अधिक असेल ती घ्यावी . कारण , " सांवत्सरिकाची तिथि ज्या वेळीं दोन दिवशीं अपराह्णव्यापिनी असेल त्या वेळीं अधिकव्यापिनी असेल तिची प्रशंसा महर्षि करितात " अशी मरिचिस्मृति आहे . " दर्शपूर्णमास याग , व बापाचें सांवत्सरिक हीं पूर्वविद्ध तिथीस न करणारा नरकास जातो " असें अपरार्कांत नारदवचन आहे . " सांवत्सरिकाची तिथि ज्या वेळीं दोन्ही दिवशीं अपराह्णव्यापिनी नाहीं , त्या वेळीं पूर्वदिवशीं सायंकालीं तीन मुहूर्त असेल तर ती पूर्वा करावी " असें सुमंतुवचन आहे . ‘ पूर्वविद्धा० ’ या ठिकाणीं ‘ पूर्वस्यां निर्वपेत् पिंडानित्यांगिरसभाषितं ’ असा हेमाद्रींत पाठ आहे . त्याचा अर्थ - ‘ पूर्वतिथींत पिंड द्यावे , असें अंगिरस सांगतो ’ असा आहे . तेथेंच वृद्धमनु - " जी मृतदिवसाची तिथि दोन्ही दिवशीं अपराह्णव्यापिनी नसेल व सायंकालीं त्रिमुहूर्तव्यापिनी असेल ती पूर्वविद्धाच करावी . " मदनरत्नांतही असेंच आहे . आतां जें कार्ष्णाजिनि व व्यास सांगतो कीं , जेव्हां सूर्यास्तसमयीं कलामात्र तिथि असेल तेव्हां प्रतिसांवत्सरिकास तीच तिथि घ्यावी , परा घेऊं नये ; कारण , परतिथि पुत्रहानि करणारी आहे ही पूर्वीं सांगितलेल्या त्रिमुहूर्ताची स्तुति आहे . पूर्वदिवशीं सायंकालीं तीन मुहूर्त नसेल तर पराच घ्यावी . कारण , पूर्वदिवशीं सायंकालीं तीन मुहूर्त नसेल तर घेऊं नये , पराच घ्यावी ; कारण , ती कुतपकालीं आहे , " असें कालादर्शांत गोभिलवचन आहे . कालादर्शांतही " प्रतिसांवत्सरिकांतही अशीच अपराह्णव्यापिनी असेल ती तिथि घ्यावी . दोन्ही दिवशीं अपराह्णव्यापिनी असेल तर अधिक ती घ्यावी . दोन दिवशीं समव्याप्ति असतां व मुळींच व्याप्ति नसतां जर सायंकाळीं त्रिमुहूर्त असेल तर ती पूर्वविद्धाच घ्यावी , हा निर्णय सर्वांना इष्ट आहे . " अन्यग्रंथांतही - दुसर्या दिवशीं सायंकाळीं जर मृत तिथि असेल तर तीच प्रत्याब्दिकास व मासिकास घ्यावी , ती जर दोन्ही दिवशीं अपराह्णीं असेल तर अधिक असेल ती घ्यावी . दोन्ही अपराह्णीं समान असेल तर पूर्वा घ्यावी . दोन्ही दिवशीं अपराह्णीं नसेल व पूर्व दिवशीं सूर्यास्तसमयीं तीन मुहूर्त असेल तर ती पूर्वाच घ्यावी . सायंकालीं तीन मुहूर्त नसेल तर पराच योग्य आहे . "
माधवपृथ्वीचंद्रौतु दिनद्वयेपराह्णव्याप्तौ अंशतः समव्याप्तौचक्षयेपूर्वावृद्धौपरा खर्वदर्पौपरौपूज्यावित्युक्तेः अपराह्णद्वयव्यापिन्यतीतस्यचयातिथिः क्षयेपूर्वाचकर्तव्यावृद्धौकार्यातथोत्तरेतिबौधायनोक्तेः क्षयाहस्यतिथिर्यातुअपराह्णद्वयेयदि पूर्वाक्षयेतुकर्तव्यावृद्धौकार्यातथोत्तरेतिबृहन्नारदीयाच्चेत्याहुः वृद्धिक्षयौचात्रपरतिथेर्नतुग्राह्यतिथेः तस्याः क्षयेपराह्णद्वयव्याप्तेरसंभवात् तदाहमाधवः नग्राह्यतिथिगौवृद्धिक्षयावूर्ध्वतिथेस्तुताविति यत्तुपृथ्वीचंद्रः पूर्वोक्तवचनेषुयत्रसायाह्नास्तमययोगिनीतिथिरुक्ता तत्रापराह्णव्यापिनीज्ञेया सायाह्नस्त्रिमुहूर्तः स्यात्तत्रश्राद्धंनकारयेदिति मात्स्यादौसायाह्ननिषेधात् यच्चत्रिमुहूर्तादिग्रहणंतच्छ्राद्धार्हापराह्णरुपत्रिमुहूर्तपरमित्याह तद्धेमाद्रिमदनरत्नकालादर्शादिग्रंथविरोधाल्लक्षणापत्तेश्चचिंत्यम् तस्मात्पूर्वोक्तमेवसाधु ।
माधव आणि पृथ्वीचंद्र तर दोन्ही दिवशीं अपराह्णव्याप्ति आणि अंशानें समव्याप्ति असतां तिथि क्षय होणारी असेल तर पूर्वा आणि तिथि वृद्धि होणारी असेल तर परा घ्यावी . कारण , ‘ खर्व ( साम्य ) आणि दर्प ( वृद्धि ) हे पर योग्य आहेत ’ असें वचन आहे . " मृताहाची जी तिथि दोन दिवशीं अपराह्णव्यापिनी असेल ती क्षय असतां पूर्वा आणि वृद्धि असतां परा करावी " असें बौधायनाचें वचन आहे . आणि " मृताहाची तिथि जर दोन अपराह्णांत आहे तर क्षयगामिनी असतां पूर्वा आणि वृद्धिगामिनी असतां उत्तरा करावी " असें बृहन्नारदीयांतही वचन आहे , असें सांगतात . येथें वृद्धि आणि क्षय हे परतिथीचे समजावे . ग्राह्यतिथीचे समजूं नयेत ; कारण , ग्राह्यतिथि क्षयगामिनी असेल तर दोन दिवशीं संपूर्ण अपराह्णव्याप्ति संभवणार नाहीं . तेंच माधव सांगतो - " ग्राह्यतिथीचे वृद्धिक्षय समजूं नयेत . पुढच्या तिथीचे समजावे . " आतां जें पृथ्वीचंद्र सांगतो कीं , ‘ जेथें पूर्वोक्त ( कार्ष्णाजिनि - व्यासादि ) वचनांत सायाह्नीं अस्तमयव्यापिनी तिथि सांगितली तेथें अपराह्णव्यापिनी समजावी . कारण , " सायाह्न काल तीन मुहूर्त आहे , त्या कालीं श्राद्ध करुं नये " असा मत्स्यपुराणादिकांत सायाह्नाचा निषेध आहे . आणि पूर्वोक्त सुमंतु इत्यादि वचनांत जें त्रिमुहूर्तादि तिथीचें ग्रहण सांगितलें तें श्राद्धाला योग्य जो अपराह्णरुप त्रिमुहूर्त तद्विषयक आहे , असें सांगतो . तें पृथ्वीचंद्राचें मत ; हेमाद्रि , मदनरत्न , कालादर्श इत्यादि ग्रंथांशीं विरुद्ध असल्यामुळें आणि सायाह्न शब्दाची अपराह्णीं लक्षणा करुं लागेल म्हणून चिंत्य ( अनादरणीय ) आहे . तस्मात् पूर्वोक्त ( पूर्वदिवशीं सायंकालीं त्रिमुहूर्त नसेल तर परा इत्यादि ) निर्णयच बरोबर आहे .
यदाविघ्नवशाद्दिनेसांवत्सरंश्राद्धंनकृतंतदारात्रावपिकार्यं मृताहंसमतिक्रम्यचंडालेष्वभिजायतइतिमरीचिनामृताहातिक्रमेदोषोक्तेः नचनक्तंश्राद्धंकुर्वीतारब्धेवाभोजनसमापनमित्यापस्तंबेनगौणकालोक्तेश्चेति माधवः आरब्धेश्राद्धेविघ्नवशाद्रात्रिभागेपातेभोजनसमाप्त्यंतंरात्रौकार्यंशेषसमाप्तिः परदिनेएवेतिहरदत्तः ग्रहणदिनेवार्षिकप्राप्तौतद्दिनएवान्नेनामेनहेम्नावाकुर्यात् नोत्तरदिनेइत्युक्तंप्राक् ग्रहणनिर्णये तच्चप्रथमाब्दिकंत्रयोदशेमलमासेकार्यमन्यथान प्रत्यब्दंद्वादशेमासिकार्यापिंडाक्रियासुतैः क्कचित्र्त्रयोदशेपिस्यादाद्यंमुक्त्वातुवत्सरमितिलघुहारीतोक्तेः इदमंत्याधिकमासपरं द्वादशेत्रयोदशेवातीतइत्यर्थः तेनयत्रद्वादशमासिकंशुद्धमासेभवति तत्रत्रयोदशेधिकेएवाब्दिकंकार्यं यत्राधिकमध्येद्वादशंमासिकंतत्रतस्यद्विरावृत्तिंकृत्वाचतुर्दशेशुद्धएवप्रथमाब्दिकमितिमाधवीये हेमाद्रौचैवं द्वितीयाब्दिकंतुशुद्धमासएवनाधिकेनाप्युभयोः मलमासमृतानांतुयदासएवाधिकः स्यात्तदातत्रैवकार्यमन्यथाशुद्धएवेतिप्रागुक्तम् ।
जेव्हां कोणत्याही विघ्नाच्या योगानें दिवसा सांवत्सरिक श्राद्ध केलें नसेल तेव्हां तें रात्रींही करावें . कारण , " मृतदिवसाचें अतिक्रमण केलें तर चंडालांत जन्म होतो " असा मरीचीनें मृतदिवसाच्या उल्लंघनाविषयीं दोष सांगितला आहे . " रात्रीं श्राद्ध करुं नये , व श्राद्धाला आरंभ केला तर ब्राह्मणभोजनापर्यंत करावें " या आपस्तंबवचनानें रात्रीं गौणकाल सांगितला आहे , असें माधव सांगतो . श्राद्धाला आरंभ केला असून विघ्नवशेंकरुन रात्रि प्राप्त झाली असतां भोजनसमाप्तिपर्यंत रात्रीं करावें , शेषश्राद्धाची समाप्ति दुसर्या दिवशींच करावी , असें हरदत्त सांगतो . ग्रहणदिवशीं वार्षिक श्राद्ध प्राप्त असतां त्याच दिवशीं अन्नानें , आमानें किंवा हिरण्यानें करावें , दुसर्या दिवशीं करुं नये , असें पूर्वीं ग्रहणनिर्णयांत सांगितलें आहे . तें श्राद्ध प्रथमाब्दिक असेल तर मृतमासापासून तेरावा मलमास असतां त्या मलमासांत करावें . अन्यथा म्हणजे द्वितीयादि आब्दिक तेराव्या मलमासांत करुं नये . कारण , " प्रतिवर्षीं बारावा मास गेल्यावर तेराव्याच्या प्रारंभीं पिंडदानक्रिया पुत्रांनीं करावी . क्कचित्स्थलीं ( तेराव्या अधिकमास असतां ) प्रथमाब्दिक वर्ज्य करुन द्वितीयादि आब्दिक तेरावा मास गेल्यावर चवदाव्याच्या प्रारंभीं करावें " असें लघुहारीतवचन आहे . हें वचन तेरावा अधिकमास असेल तद्विषयक आहे . तेणेंकरुन जेथें द्वादश मासिक शुद्धमासांत होतें तेथें तेराव्या अधिकांतच प्रथमाब्दिक करावें . जेथें अधिकांत बारावें मासिक होतें म्हणजे मृतमास धरुन बारावा मास अधिक येतो , तेथें त्या द्वादशमासिकाची मलांत व शुद्धांत दोन वेळ आवृत्ति करुन चवदाव्या शुद्धमासांतच प्रथमाब्दिक करावें , असें माधवीयांत आहे . हेमाद्रींतही असेंच आहे . द्वितीयादि आब्दिक तर शुद्धमासांतच करावें . अधिकांत किंवा दोन्ही मासांत करुं नये . मलमासांत मृत झालेल्यांचें तर जेव्हां तोच मास अधिक येईल तेव्हां त्या अधिकांतच करावें . अन्यथा शुद्धांतच करावें , असें पूर्वीं ( प्रथमपरिच्छेदांत ) सांगितलें आहे .
दर्शेवार्षिकंचेत्तदापूर्वंवार्षिकंकृत्वाततः पिंडपितृयज्ञोदर्शश्राद्धंचेतिनिर्णयदीपेक्रमउक्तः स्मृतिसारेपिदर्शेक्षयाहेसंप्राप्तेकथंकुर्वंतियाज्ञिकाः आदौक्षयाहंनिर्वर्त्यपश्चाद्दर्शोविधीयतइति युक्तंत्वेवम् तद्वचनेमूलाभावात् पिंडयज्ञंततः कुर्यात्ततोन्वाहार्यकंबुधइतिदर्शश्राद्धेपिंडपितृयज्ञानंतर्यात्तस्याब्दिकेप्यतिदेशात्प्राप्तेपितृयज्ञानंतरंवार्षिकंततोदर्शश्राद्धमिति व्यतिषंगस्तुनभवत्येव तस्यार्थिकत्वात् कालादर्शेपि निमित्तानियतिश्चात्रपूर्वानुष्ठानकारणमिति सर्वान् प्रत्यैकरुप्याभावात् क्षयाहनिमित्तस्यानियतत्वम् देवजानीयेप्येवं एवं मासिकादिष्वपिज्ञेयं प्रत्यब्दंयोयथाकुर्यात्सतान्यपीतिसर्वातिदेशात् मृताहेवृषोत्सर्गउक्तोहेमाद्रौविष्णुधर्मे अयनद्वितयेचैवमृताहेबांधवस्यच उत्सृजेन्नीलवृषभंकौमुद्याः समुपागमे कौमुदीकार्तिकी ।
दर्शाच्या दिवशीं वार्षिक प्राप्त असेल तर पूर्वीं वार्षिक करुन नंतर पिंडपितृयज्ञ आणि दर्शश्राद्ध करावें , असा निर्णयदीपांत क्रम सांगितला आहे . स्मृतिसारांतही " दर्शांत क्षयदिवस प्राप्त असतां याज्ञिक कसें करितात ? आधीं क्षयाहश्राद्ध करुन नंतर दर्श करितात . " युक्त म्हटलें तर असें आहे कीं , त्या निर्णयदीपाच्या वचनास मूलप्रमाण नाहीं . आणि " पिंडयज्ञ करुन नंतर दर्शश्राद्ध करावें " या वचनानें दर्शश्राद्धाचेठायीं पिंडपितृयज्ञानंतरत्व सिद्ध झाल्यानें तें पिंडपितृयज्ञानंतरत्व अतिदेशानें ( प्रकृति दर्श व त्याची विकृति सांवत्सरिक , प्रकृतीप्रमाणें विकृति करावी अशा अर्थानें ) सांवत्सरिकाचे ठायींही प्राप्त असल्यामुळें पिंडपितृयज्ञानंतर सांवत्सरिक , नंतर दर्शश्राद्ध करावें . व्यतिषंग ( पितृयज्ञ व वार्षिक यांचें सहानुष्ठान ) तर होतच नाहीं ; कारण , तो आर्थिक आहे . दर्शाच्या पूर्वीं वार्षिकाविषयीं वरील स्मृतिसाराचें वचन आहे . आणि कालादर्शांतही सांगतो - " दर्शापेक्षां पूर्वीं करण्याचें कारण , याचें ( सांवत्सरिकाचें ) निमित्त अनियमित आहे हें होय . " सर्वांचीं क्षयाहश्राद्धें दर्शास नाहींत म्हणून क्षयाहनिमित्त अनियमित होय . देवजानीयांतही असेंच आहे . याचप्रमाणें मासिकादिकांविषयींही समजावें . कारण , ‘ प्रतिवर्षीं जो जसें करील त्यानें तीं ( मासिकादिक ) ही तशींच करावीं ’ असा सर्वांचा अतिदेश केलेला आहे . मृतदिवशीं वृषोत्सर्ग सांगितला आहे हेमाद्रींत विष्णुधर्मांत - " दोन अयनीं ( दक्षिणायनीं व उत्तरायणीं ), बांधवाच्या मृतदिवशीं आणि कार्तिकी पौर्णिमेस नीलवृषभाचा उत्सर्ग करावा . "