आतां श्राद्धकर्ता व श्राद्धभोक्ता यांचे नियम सांगतो -
अथश्राद्धकर्तृभोक्तृनियमाः तत्रनिमंत्रितविप्रत्यागेऽपरार्केयमः केतनंकारयित्वातुयोतिपातयतिद्विजम् ब्रह्महत्यामवाप्नोतिशूद्रयोनौचजायते आमंत्र्यब्राह्मणंयस्तुयथान्यायंनपूजयेत् अतिकृच्छ्रासुघोरा सुतिर्यग्योनिषुजायते प्रमादात्त्यागेतुहारीतः प्रमादाद्विस्मृतंज्ञात्वाप्रसाद्यैनंप्रयत्नतः तर्पयित्वायथान्यायंसर्वंतत् फलमश्नुते प्रमादाभावेतुनारायणः एतस्मिन्नेनसिप्राप्तेब्राह्मणोनियतः शुचिः यतिचांद्रायणंकृत्वातस्मात्पापात्प्रमुच्यते यमः आमंत्रितस्तुयोविप्रोभोक्तुमन्यत्रगच्छति नरकाणांशतंगत्वाचांडालेष्वभिजायते तत्रैवदेवलः पूर्वंनिमंत्रितोन्येनकुर्यादन्यप्रतिग्रहं भुक्ताहारोथवाभुंक्तेसुकृतंतस्यनश्यति यदिविप्रोविलंबेततदोक्तमादित्यपुराणे आमंत्रितश्चिरंनैवकुर्याद्विप्रः कदाचन देवतानांपितृणांचदातुरन्नस्यचैवहि चिरकारीभवेद्द्रोहीपच्यतेनरकाग्निना पृथ्वीचंद्रोदयेयमः निमंत्रितस्तुयोविप्रोह्यध्वानंयातिदुर्मतिः भवंतिपितरस्तस्यतंमासंपांसुभोजनाः आमंत्रितस्तुयः श्राद्धेहिंसांवैकुरुतेद्विजः पितरस्तस्यतंमासंभवंतिरुधिराशनाः आमंत्रितस्तुयोविप्रोभारमुद्वहतेद्विजः पितरस्तस्यतंमासंभवंतिस्वेदभोजनाः निमंत्रितस्तुयोविप्रः प्रकुर्यात्कलहंयदि पितरस्तस्यतंमासंभवंतिमलभोजनाः ।
श्राद्धाचेठायीं निमंत्रण केलेल्या ब्राह्मणाचा त्याग केला असतां अपरार्कांत यम - " जो मनुष्य आमंत्रण देऊन त्या ब्राह्मणाचा त्याग करील त्यास ब्रह्महत्या दोष प्राप्त होतो व तो मनुष्य शूद्रयोनींत जातो . जो मनुष्य ब्राह्मणास आमंत्रण देऊन त्याची यथायोग्य पूजा करीत नाहीं , तो मनुष्य अतिकष्टदायक भयंकर अशा तिर्यग् ( पश्वादिकांचे ) योनींत उत्पन्न होतो . " प्रमादानें त्याग केला असतां हारीत - " प्रमादानें ब्राह्मणाची विस्मृति झाली असें जाणून त्या ब्राह्मणाला प्रयत्नानें ( हात जोडून वगैरे ) प्रसन्न करुन यथान्याय तृप्त करावा , म्हणजे ब्राह्मणभोजनाचें सर्व फळ मिळतें . " प्रमाद नसून बुद्धिपूर्वक त्याग केला असेल तर नारायण - " हें ( ब्राह्मणत्यागरुप ) पातक प्राप्त असतां ब्राह्मणानें नियमित शुचिर्भूत होऊन यतिचांद्रायण करावें , म्हणजे त्या पापापासून मुक्त होतो . " यम - " जो ब्राह्मण एकीकडचें आमंत्रण घेऊन भोजनास दुसरीकडे जातो , तो शंभर नरकांत जाऊन चांडालयोनींत उत्पन्न होतो . " तेथेंच देवल - " जो ब्राह्मण पूर्वीं एकाचें निमंत्रण घेऊन दुसर्याचा प्रतिग्रह करितो , अथवा पूर्वीं आहार भक्षण करुन नंतर श्राद्धांत भोजन करितो त्याचें सुकृत नष्ट होतें . " जर ब्राह्मणानें विलंब केला तर सांगतो आदित्यपुराणांत - " आमंत्रण केलेल्या ब्राह्मणानें कधींही विलंब करुं नये ; विलंब करणारा ब्राह्मण देवता , पितर , दाता आणि अन्न इतक्यांचा द्रोही होऊन नरकरुप अग्नीनें पक्क होतो . " पृथ्वीचंद्रोदयांत यम - " निमंत्रण केलेला जो दुष्टमति ब्राह्मण मार्गक्रमण करितो , त्याचे पितर तो महिना पांसु ( धूलि ) भोजन करणारे होतात . जो श्राद्धास आमंत्रित ब्राह्मण हिंसा करितो त्याचे पितर तो महिना रक्तभोजी होतात . जो आमंत्रित ब्राह्मण भार वाहातो त्याचे पितर तो महिना स्वेदभोजी होतात . जो निमंत्रित ब्राह्मण कलह करील तर त्याचे पितर तो महिना मलभोजी होतात . "
शंखः निमंत्रितस्तुयः श्राद्धेमैथुनंसेवतेद्विजः श्राद्धंदत्त्वाचभुक्त्वाचयुक्तः स्यान्महतैनसा मैथुनंऋतावपिनिषिद्धम् ऋतुकालेनियुक्तोवानैवगच्छेत् स्त्रियंक्कचित् तत्रगच्छन्नवाप्नोतिह्यनिष्टानिफलानितु इतितत्रमाधवीयेचवृद्धमनूक्तेः श्राद्धंकरिष्यन् कृत्वावाभुक्त्वावापिनिमंत्रितः उपोष्यचतथाभुक्त्वानोपेयाच्चऋतावपि भोक्ष्यन् करिष्यन् श्वः श्राद्धंपूर्वरात्रौप्रयत्नतः व्यवायंभोजनंचापिऋतावपिविवर्जयेत् इतितत्रैवाश्वलायनोक्तेश्च विज्ञानेश्वरेंणतुश्राद्धेऋतौगच्छतोपिनदोषइत्युक्तंतत्त्वगतिकगतित्वेज्ञेयम् बृहस्पतिः द्विनिशंब्रह्मचारीस्याच्छ्राद्धकृद्ब्राह्मणैः सह अन्यथावर्तमानौतुस्यातांनिरयगामिनौ पुनर्भोजनमध्वानंभारमायासमैथुनम् श्राद्धकृच्छ्राद्धभुक् चैवसर्वमेतद्विवर्जयेत् स्वाध्यायंकलहंचैवदिवास्वापंतथैवच यत्तु श्राद्धकारिकायांपुराणसमुच्चये कृत्वातुरुधिरस्रावंनविद्वान् श्राद्धमाचरेत् एकंद्वेत्रीणिवाविद्वान् दिनानिपरिवर्जयेत् इतितन्निर्मूलम् पृथ्वीचंद्रोदयेयमः पुनर्भोजनमध्वानंभाराध्ययनमैथुनम् संध्यांप्रतिग्रहंहोमंश्राद्धभोक्ताऽष्टवर्जयेत् इति संध्यानिषेधः प्रायश्चित्तात्पूर्वंज्ञेयः यथाहोशनाः दशकृत्वः पिबेदापोगायत्र्याश्राद्धभुक् द्विजः ततः संध्यामुपासीतजपेच्चजुहुयादपि गौडास्तु सायंसंध्यांपरान्नंचछेदनंचवनस्पतेः अमावास्यांनकुर्वीतरात्रिभोजनमेवच द्यूतंचकलहंचैवसायंसंध्यांदिवाशयम् श्राद्धकर्ताचभोक्ताचपुनर्भुक्तिंचवर्जयेत् इतिकामधेनौवाराहाद्युक्तेः श्राद्धकर्तुरपिसायंसंध्यानिषेधमाहुः शिष्टास्तुनिर्मूलत्वमाहुः होमनिषेधस्तुस्वविषयः सूतकेचप्रवासेचअशक्तौश्राद्धभोजने एवमादिनिमित्तेषुहावयेन्नतुहापयेत् इतिछंदोगपरिशिष्टात् तत्रैवादित्यपुराणे निमंत्रितस्तुनश्राद्धेकुर्याद्भार्यादिताडनम् चंद्रिकायांप्रचेताः श्राद्धभुक् प्रातरुत्थायप्रकुर्याद्दंतधावनम् श्राद्धकर्तानकुर्वीतदंतानांधावनंबुधः हेमाद्रौजाबालिः दंतधावनतांबूलेतैलाभ्यंगमभोजनम् रत्यौषधंपरान्नंचश्राद्धकृत्सप्तवर्जयेत् इति विष्णुरहस्ये श्राद्धोपवासदिवसेखादित्वादंतधावनम् गायत्र्याशतसंपूतमंबुप्राश्यविशुध्यति पुनर्भोजनमध्वानंयानमायासमैथुनम् दानप्रतिग्रहौहोमंश्राद्धभूक् त्वष्टवर्जयेत् सोमोत्पत्तौ
वनस्पतिगतेसोमेयस्तुहिंस्याद्वनस्पतिम् घोरायांभ्रूणहत्यायांयुज्यतेनात्रसंशयः एतद्विहितेध्मादिव्यतिरेकेण
वनस्पतिगतेसोमेऽनडुहोयस्तुवाहयेत् नाश्नन्तिपितरस्तस्यदशवर्षाणिपंचच वनस्पतिगतेसोमेमंथानंयस्तुकारयेत् गावस्तस्यप्रणश्यंतिचिरकालमुपस्थिताः वनस्पतिगतस्वरुपमाह पृथ्वीचंद्रोदयेव्यासः त्रिमुहूर्तंवसेदर्केत्रिमुहूर्तंवसेज्जले त्रिमुहूर्तंवसेद्गोषुत्रिमुहूर्तंवनस्पतौ कलिकायांवृद्धमनुः निमंत्र्यविप्रांस्तदहर्वर्जयेन्मैथुनंक्षुरं प्रमत्ततांचस्वाध्यायंक्रोधाशौचेतथानृतम् केचिन्निमंत्रणात्पूर्वंशुद्ध्यर्थंपूर्वेह्निक्षौरंकुर्वंति तत्रमूलंमृग्यम् मरीचिः षष्ठ्यांपर्वसुपक्षादौरिक्ताभद्रातिथिष्वपि पातेश्राद्धेव्रताहेचक्षौरंवर्ज्यंनिशासुच यदाकर्तुरशक्त्यातत्पुत्रशिष्यादिः श्राद्धंकरोतितदाकर्त्राप्रतिनिधिनाचप्रागुक्तनियमाः कार्याः नशक्नोतिस्वयंकर्तृंयदाह्यनवकाशतः श्राद्धंशिष्येणपुत्रेणतदान्येनापिकारयेत् नियमानाचरेत्सोपिनियतांश्चवसुंधरे यजमानोपितान्सर्वानाचरेत्सुसमाहितइतिहेमाद्रौवाराहोक्तेः स्त्रियास्तुपाद्मे मुक्तकच्छातुयानारीमुक्तकेशीतथैवच हसतेवदतेचैवनिराशाः पितरोगताः आश्वलायनः श्राद्धेह्निभोजयेद्वास्तौनबालानपियत्नतः प्राक् पिंडदानाद्गंधाद्यैर्नालंकुर्यात्स्वविग्रहम् वास्तौगृहे ।
शंख - " जो श्राद्धाचेठायीं आमंत्रण केलेला ब्राह्मण मैथुन करितो तो , तसेंच श्राद्ध करुन मैथुन करितो किंवा श्राद्धास भोजन करुन मैथुन करितो तो मोठ्या पापानें युक्त होतो . " मैथुन ऋतुकालीदेखील निषिद्ध आहे . कारण , " श्राद्धास निमंत्रित ब्राह्मण असून ऋतुकालीं नियोग केलेला असला तरी त्यानें स्त्रीगमन कधींही करुं नये , स्त्रीगमन करणारास अनिष्ट फलें प्राप्त होतात " असें पृथ्वीचंद्रोदयांत व माधवीयांत वृद्धमनुवचन आहे . आणि " उद्यां श्राद्ध करावयाचें असतां पूर्वदिवशीं , अथवा श्राद्ध करुन त्या दिवशीं , तसेंच ब्राह्मणानें निमंत्रण घेतल्यानंतर व श्राद्धभोजन केल्यानंतर , तसेंच उपोषण करुन त्या दिवशीं व पारणा करुन त्या दिवशीं ऋतुकालींही स्त्रीगमन करुं नये . दुसर्या दिवशीं श्राद्धभोजनास जाणारा , व श्राद्ध करणारा यानें पूर्वरात्रीं ऋतुकालींदेखील मैथुन व भोजन हें प्रयत्नानें वर्ज्य करावें . " असें तेथेंच आश्वलायन वचनही आहे . विज्ञानेश्वरानें तर श्राद्धदिवशीं ऋतुकालीं स्त्रीगमन केलें तरी दोष नाहीं , असें सांगितलें तें , गमन केल्यावांचून गति नाहीं असें असेल त्याविषयीं समजावें . बृहस्पति - " श्राद्धकर्त्यानें ब्राह्मणांसहवर्तमान दोन रात्रीं ब्रह्मचर्य धारण करुन असावें , श्राद्धकर्ता व ब्राह्मण हे दोघे ब्रह्मचर्यत्याग करतील तर नरकगामी होतील . श्राद्धकर्ता व भोक्ता यानें पुनः भोजन , मार्गक्रमण , भार वाहाणें , आयास , मैथुन हें सर्व वर्ज्य करावें . तसेंच वेदाध्ययन , कलह , दिवसा निद्रा हीं तशींच वर्ज्य करावीं . " आतां जें श्राद्धकारिकेंत पुराणसमुच्चयांत " विद्वानानें रक्तस्त्राव करुन श्राद्ध करुं नये , रक्तस्त्राव केल्यावर एक , दोन अथवा तीन दिवस वर्ज्य करावे " असें सांगितलें तें निर्मूल आहे . पृथ्वीचंद्रोदयांत यम - " श्राद्धभोक्त्यानें , पुनर्भोजन , मार्गक्रमण , भार वाहाणें , अध्ययन , मैथुन , संध्या , प्रतिग्रह , होम , हीं आठ वर्ज्य करावीं . " हा संध्यानिषेध प्रायश्चित्ताच्या पूर्वीं समजावा . कारण , उशना सांगतो - " श्राद्धभोक्त्या ब्राह्मणानें गायत्रीनें दाहावेळ उदकाचें अभिमंत्रण करुन तें उद्क प्राशन करावें , नंतर संध्या करावी , जप करावा , होमही करावा . " गौड तर - " सायंसंध्या , परान्न , वनस्पतीचें छेदन आणि रात्रींभोजन हीं अमावास्येस करुं नयेत . श्राद्धकर्ता व भोक्ता यानें द्यूत , कलह , सायंसंध्या , दिवसा निद्रा आणि पुनर्भोजन हीं वर्ज्य करावीं " असें कामधेनुग्रंथांत वराहादि वचन आहे . म्हणून श्राद्धकर्त्यालाही सायंसंध्यानिषेध सांगतात . शिष्ट तर हेंच वचन निर्मूल म्हणतात . पूर्वींच्या यमाच्या वचनांत होमनिषेध आहे तो स्वविषयक समजावा . कारण , " आशौचांत , प्रवासांत , सामर्थ्य नसतां , श्राद्धभोजन केलें असतां इत्यादि निमित्तांचे ठायीं दुसर्याकडून होम करवावा , होमत्याग करुं नये . " असें छंदोगपरिशिष्टवचन आहे . तेथेंच आदित्यपुराणांत - " श्राद्धाविषयीं निमंत्रित ब्राह्मणानें भार्यादिकांचें ताडण करुं नये . " चंद्रिकेंत प्रचेता - " श्राद्धभोक्त्यानें प्रातःकालीं उठून दंतधावन करावें ; श्राद्धकर्त्यानें दंतधावन करुं नये . " हेमाद्रींत जाबालि - " श्राद्धकर्त्यानें दंतधावन , तांबूलभक्षण , तैलाभ्यंग , उपवास , सुरत , औषध , परान्न हीं सात वर्ज्य करावीं . " विष्णुरहस्यांत - " श्राद्धदिवशीं व उपवासदिवशीं दंतधावन करणारा गायत्रीनें शंभरवेळां अभिमंत्रण केलेलें उदक प्राशन करुन शुद्ध होतो . दुसर्यांदां भोजन , मार्ग चालणें , वाहनावर बसणें , आयास , मैथुन , दान , प्रतिग्रह , होम हीं आठ श्राद्धभोक्त्यानें वर्ज्य करावीं . " सोमोत्पत्तिग्रंथांत - " सोम वनस्पतींत गेला असतां जो मनुष्य वनस्पतीची हिंसा करील तो घोर अशा भ्रूणहत्यापातकानें युक्त होईल , यांत संशय नाहीं . " हा निषेध विहित जी इध्मादिकांसाठीं हिंसा ती वर्ज्य करुन इतर हिंसाविषयक समजावा . " सोम वनस्पतींत गेला असतां जो बैलांकडून ओझें वाहवितो त्याचे पितर पंधरा वर्षै उपोषित राहतात . सोम वनस्पतींत गेला असतां जो मंथन करितो त्याच्या चिरकाल असलेल्या गाई नष्ट होतात . " वनस्पतिगत गेलेल्या सोमाचें स्वरुप सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत व्यास - " सोम सूर्यांत तीन मुहूर्त राहातो , उदकांत तीन मुहूर्त , गाईंत तीन मुहूर्त आणि वनस्पतींत तीन मुहूर्त राहातो . " कलिकेंत वृद्धमनु - " ब्राह्मणांस निमंत्रण करुन त्या दिवशीं मैथुन , क्षौर , प्रमाद , वेदाध्ययन , क्रोध , अशुचित्व , असत्य हीं वर्ज्य करावीं . " केचित् पूर्वदिवशीं निमंत्रणाच्या पूर्वीं शुद्धीसाठीं क्षौर करितात , त्याविषयीं मूळ शोधावें . मरीचि - " षष्ठी , पर्वदिवस , प्रतिपदा , रिक्तातिथि , व्यतीपात , श्राद्धदिवस , व्रतदिवस आणि रात्र इतक्यांचेठायीं क्षौर वर्ज्य आहे . " जेव्हां कर्त्याला शक्ति नसल्यामुळें त्याचा पुत्र , शिष्य इत्यादिक प्रतिनिधि श्राद्ध करितो तेव्हां पूर्वोक्त नियम कर्त्यानें व प्रतिनिधीनें दोघांनींही करावे ; कारण , ज्या वेळीं स्वतः श्राद्ध करण्याविषयीं अशक्त असेल किंवा अवकाश नसेल त्या वेळीं श्राद्ध शिष्याकडून , पुत्राकडून व इतराकडूनही करवावें ; श्राद्धाचे सर्व नियम श्राद्धकर्त्यानें ( प्रतिनिधीनें ) व यजमानानेंही आचरण करावे " असें हेमाद्रींत वराहवचन आहे . स्त्रियांविषयीं तर पाद्मांत सांगतो - " कच्छ सोडलेली , केश सोडलेली , हंसणारी व बोलणारी अशी स्त्री असेल तर पितर निराश होऊन जातात . " आश्वलायन - " श्राद्धदिवशीं घरांत बालांना देखील भोजन घालूं नये . पिंडदान करण्याच्या पूर्वीं आपल्या देहाला गंधादिकांनीं अलंकार करुं नये . "