मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
वृषोत्सर्ग

तृतीय परिच्छेद - वृषोत्सर्ग

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां वृषोत्सर्ग सांगतो -

अथवृषोत्सर्गः सचनित्यकाम्यः नकरोतिवृषोत्सर्गंसुतीर्थेवाजलांजलिम् नददातिसुतोयस्तुपितुरुच्चारएवसः उच्चारः पुरीषं एष्टव्याबहवः पुत्रायद्येकोपिगयांव्रजेत् यजेतवाश्वमेधेननीलंवावृषमुत्सृजेदितिमात्स्यकौर्मोक्तेः एकादशेह्निप्रेतस्ययस्यनोत्सृज्यतेवृषः प्रेतत्वंसुस्थिरंतस्यदत्तैः श्राद्धशतैरपीतिषटत्रिंशन्मतेनिंदाश्रुतेः एवंकृत्वाह्यवाप्नोतिफलंवाजिमखोदितं यमुद्दिश्योत्सृजेन्नीलंसलभेतपरांगतिं वृषोत्सृष्टः पुनात्येवदशातीतान्दशापरानितिदेवीपुराणेभविष्यादौफलश्रुतेश्च अयंद्वादशाहेउक्तो भविष्ये चैत्र्यांवापितृतीयायांवैशाख्यांद्वादशेह्निवेति विष्णुधर्मेतुमृताहेप्युक्तः विषुवद्वितयेचैवमृताहेबांधवस्यचेति अयंगृहेनकार्यः नगृहेमोचयेन्नीलंकामयन्पुष्कलंफलमितिकालिकापुराणात् कामधेनौ वत्सराभ्यंतरेपित्रोर्वृषस्योत्सर्गकर्मणि वृद्धिश्राद्धंनकुर्वीततदन्यत्रसमारभेत् तल्लक्षणंतुब्राह्मे लोहितोयस्तुवर्णेनमुखेपुच्छेचपांडुरः श्वेतः खुरविषाणाभ्यांसनीलोवृषउच्यते श्वेतवर्णस्यमुखादीनिश्यामानिश्यामस्यवाश्वेतानियस्यसोपिनीलउक्तोमात्स्यादौ देवीपुराणे चतस्त्रोवत्सिकाभद्राद्वेवासंभवतोपिवा यत्तुपठंति वृषोत्सर्जनवेलायांवृषाभावः कथंचन मृद्भिः पिष्टैश्चदर्भैर्वावृषंकृत्वाविमोचयेत् नशक्यतेवृषोत्सर्गोहोमंवातत्रकारयेदिति तन्निर्मूलं तद्विधिर्हेमाद्रौभट्टकृतौचज्ञेयः अत्रदेवयाज्ञिकेनवृषोत्सर्गात्पूर्वंपुरुषसूक्तेनविष्णुरुपिप्रेतोद्देशेनविष्णुतर्पणमुक्तं तत्रमूलंचिंत्यं ।

तो वृषोत्सर्ग नित्य आणि काम्य आहे . कारण , " जो पुत्र वृषोत्सर्ग करीत नाहीं , किंवा उत्तम तीर्थांत पितरांना उदकांजलि देत नाहीं , तो पित्याचा उच्चार ( पुरीष , मल ) च आहे . बहुत पुत्रांची इच्छा करावी . कारण , त्यांतील एक पुत्र तरी गयेस जाईल , अथवा अश्वमेध याग करील , किंवा नीलवृषाचा उत्सर्ग करील . " असें मात्स्यांत कौर्मांत वचन आहे . " ज्या प्रेताच्या उद्देशानें अकराव्या दिवशीं वृषोत्सर्ग केलेला नसेल त्याला शेंकडों श्राद्धें दिलीं तरी त्याचें प्रेतत्व सुस्थिर राहतें . " असें षटत्रिंशन्मतांत वृषोत्सर्ग नसल्याचें निंदाश्रवण आहे . म्हणून तो नित्य होय . " याप्रमाणें वृषोत्सर्ग केला असतां करणाराला अश्वमेधाचें फल प्राप्त होतें . ज्याच्या उद्देशानें वृषोत्सर्ग केला असेल त्याला उत्तमगति होते . उत्सर्ग केलेला वृष पूर्वींचे दहा व पुढचे दहा पुरुषांना पवित्र करितो " असें देवीपुराणांत व भविष्यादि पुराणांत फल सांगितलें आहे , यावरुन तो काम्य होय . हा वृषोत्सर्ग बाराव्या दिवशीं सांगितला आहे . भविष्यांत - " चैत्राचे तृतीयेस किंवा वैशाखतृतीयेस अथवा बाराव्या दिवशीं वृषोत्सर्ग करावा . " विष्णुधर्मांत मृतदिवशींही सांगितला आहे - " दोनीं विषुवायनसंक्रांतींस आणि बांधवाच्या मृतदिवशीं करावा . " हा ( वृषोत्सर्ग ) घरीं करुं नये . कारण , " पुष्कळ फल इच्छिणारानें घरीं नीलवृषोत्सर्ग करुं नये " असें कालिकापुराण आहे . कामधेनूंत - " वर्षाच्या आंत मातापितरांच्या वृषोत्सर्गकर्मामध्यें वृद्धिश्राद्ध करुं नये . तें इतर वृषोत्सर्गांत करावें . " वृषाचें लक्षण सांगतो - ब्राह्मांत - " ज्याचा सर्व शरीराचा वर्ण लोहित ( लाल ) आहे , मुख व पुच्छ पांढरीं आहेत , आणि खुर व श्रृंगें हीं शुभ्र आहेत त्याला नीलवृष असें म्हटलें आहे . " ज्याच्या शरीराचा वर्ण शुभ्र असून मुख , पुच्छ , खुर , शृंगें हीं श्यामवर्ण आहेत तो किंवा शरीराचा वर्ण श्याम आणि मुखादिक शुभ्र आहेत तोही नीलवृष , असें मत्स्यपुराणादिकांत सांगितलें आहे . देवीपुराणांत - " चार किंवा दोन पाड्या असाव्यात . दोन न मिळतील तर एक तरी असावी . " आतां जें कोणी बोलतात कीं , " वृषोत्सर्गसमयीं वृषाचा अभाव असेल तर मातीचा , पिठाचा किंवा दर्भांचा वृष करुन त्याचा उत्सर्ग करावा . अथवा ज्या ठिकाणीं वृषोत्सर्ग होण्यास शक्य नसेल त्या ठिकाणीं होम करावा ’’ असें , तें निर्मूल ( मूलरहित ) आहे . त्या वृषोत्सर्गाचा विधि हेमाद्रींत नारायणभट्टींत जाणावा . या ठिकाणीं देवयाज्ञिकानें वृषोत्सर्गाच्या पूर्वीं पुरुषसूक्तानें विष्णुरुपी प्रेताच्या उद्देशानें विष्णुतर्पण सांगितलें आहे त्याविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे .

पारस्करः सव्येनपाणिनापुच्छंसमालंब्यवृषस्यतु दक्षिणेनापआदायसतिलाः सकुशास्ततः प्रेतगोत्रंसमुच्चार्यअमुकस्मैइतिब्रुवन् वृषएषमयादत्तस्तंतारयतुसर्वदा सहेमसतिलंभूमावित्युचार्यविनिक्षिपेत् तथा विधारयेन्नतंकश्चिन्नचकश्चनवाहयेत् नदोहयेच्चताधेनूर्नचकश्चनबंधयेत् स्त्रीषुविशेषः संग्रहे पतिपुत्रवतीनारीभर्तुरग्रेमृतायदि वृषोत्सर्गंनकुर्वीतगांदद्याच्चपयस्विनीं पतिपुत्रयोः साहित्यंविवक्षितं अन्वारोहणेपिगोदानमेवेत्युक्तंप्राक् आशौचांतरेपिवृषोत्सर्गाद्यमासिकशय्यादिदद्यादेवेत्युक्तं क्रियानिबंधेस्मृत्यंतरे सूतकेमृतकेचैवद्वितीयंमृतकंयदि पिंडदानंप्रकुर्वीतवृषोत्सर्गंतथैवच नहन्यात्सूतकेकर्मद्वादशैकादशाहिकं शुद्धोवायदिवाऽशुद्धः कुर्यादेवाविचारयन्निति ।

पारस्कर - " वृषाचें पुच्छ डाव्या हातानें धरुन उजव्या हातांत तिलकुशसहित उदक घेऊन प्रेतगोत्राचा उच्चार करुन ‘ अमुकस्मै वृष एष मया दत्तस्तं तारयतु सर्वदा ’ असा उच्चार करुन सुवर्णतिलसहित उदक भूमीवर सोडावें . ’’ तसेंच - " त्या सोडलेल्या वृषभाला कोणीं धरुं नये . त्याच्याकडून भार वाहवूं नये . सोडलेल्या पाड्यांचें ( गाईंचें ) कोणी दूध काढूं नये व बांधूं नयेत . " स्त्रियांविषयीं विशेष सांगतो संग्रहांत - " पतिपुत्रयुक्त अशी स्त्री भर्त्याच्या आधीं मृत होईल तर तिला वृषोत्सर्ग करुं नये . त्याच्या स्थानीं दूध देणारी गाई द्यावी . " एथें पति व पुत्र जीवंत असतील तर हा वृषोत्सर्गनिषेध समजावा . स्त्रियेचें अनुगमन असतांही गोप्रदानच करावें , असें पूर्वीं सांगितलें आहे . दुसरें आशौच असलें तरी वृषोत्सर्ग , आद्य मासिक , शय्या इत्यादि द्यावेंच , असें सांगितलें आहे , क्रियानिबंधांत स्मृत्यंतरांत - " जननाशौचांत किंवा मृताशौचांत दुसरें मृताशौच असलें तरी पिंडदान व वृषोत्सर्ग करावा . सूतकांत द्वादशाहिक व एकादशाहिक कर्म टाकूं नये . शुद्ध असो किंवा अशुद्ध असो , विचार न करितां सर्व कृत्य करावेंच . "

अत्रपददानमुक्तंदेवजानीयेगारुडे एकादशाहंप्रक्रम्य तदह्निदीयतेसर्वैर्द्वादशाहेविशेषतः पदानि सर्ववस्तूनिवरिष्ठानित्रयोदश योददातिमृतस्येहजीवतोप्यात्महेतवे सुखीभूत्वामहामार्गेवैनतेयसगच्छति तथा आसनोपानहौछत्रंमुद्रिकाचकमंडलुः भोजनंभोजनाधारोवस्त्राण्यष्टविधंपदं तथा भाजनासनदानेनमुद्रिकाभोजनेनच आज्ययज्ञोपवीतेनपदंसंपूर्णतांव्रजेत् महिषीरथगोदानात्सुखीभवतिनिश्चितं सर्वोपस्करयुक्तानिपदान्यत्रत्रयोदश योददातिमृतस्येहजीवन्नप्यात्महेतवे सगच्छतिपरंस्थानंमहाकष्टविवर्जितः त्रयोदशपदानीत्थंप्रेतायैकादशेहनि दातव्यानियथाशक्तितेनासौप्रीणितोभवेत् अन्नंचैवोदकंचैवोपानहौचकमंडलुः छत्रंवस्त्रंतथायष्टिंलोहदंडंतथाष्टमं अग्नीष्टिकांचदीपंचतिलांस्तांबूलमेवच चंदनंपुष्पदानंचोपदानानिचतुर्दश योश्वंरथंगजंवापिब्राह्मणेप्रतिपादयेत् स्वमहिम्नोनुसारेणतत्तत्सुखमवाप्नुयादिति अत्रमूलंचिंत्यं ।

अकराव्या दिवशीं पददान सांगितलें आहे . देवजानीयांत गारुडांत एकादशाहाचा उपक्रम करुन सांगतो - " अकराव्या दिवशीं सर्व मनुष्य वरिष्ठ सर्ववस्तुरुप पदें तेरा देतात . बाराव्या दिवशीं विशेषेंकरुन देतात . जो मनुष्य मृताच्या उद्देशानें पदें देतो किंवा आपण जीवंत असतां आपल्याकरितां देतो तो मृत झालेला , प्रेताच्या मोठ्या मार्गात सुखी होऊन जातो . " तसेंच - " आसन , उपानह , ( जोडा ), छत्री , मुद्रिका , कमंडलु , भोजन ( अन्न ), भोजनपात्र , वस्त्रें हें आठ प्रकारचें पद होतें . " तसेंच - " भोजनपात्र , आसन , मुद्रिका , भोजन , घृत आणि यज्ञोपवीत यांच्या दानानें पद संपूर्ण होतें . महिषी , रथ आणि गाई यांच्या दानानें निश्चयानें सुखी होतो . जो मनुष्य सर्व साहित्यांनीं युक्त अशीं तेरा पदें अकराव्या दिवशीं मृताच्या उद्देशानें देतो ; किंवा जीवंत असून आपल्या उद्देशानें देतो तो महाकष्टरहित होऊन उत्तम स्थानाला जातो . याप्रमाणें तेरा पदें मृताला अकराव्या दिवशीं यथाशक्ति द्यावीं , त्या पददानांनीं तो प्राणी संतुष्ट होतो . अन्न , उदक , उपानह , कमंडलु , छत्री , वस्त्र , काठी , लोहदंड , शेगडी , दीप , तिल , तांबूल , चंदन आणि पुष्पें हीं चवदा उपदानें आहेत . जो मनुष्य आपल्या शक्तीला अनुसरुन अश्व , रथ किंवा हत्ती ब्राह्मणाला देईल त्याला तें तें सुख प्राप्त होईल . " याविषयीं मूलवचन चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP