मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
निर्गुणा अंगीं सगुण बाणले...

संत चोखामेळा - निर्गुणा अंगीं सगुण बाणले...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


निर्गुणा अंगीं सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥

शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गाबाळ अवघी काहाणी ॥२॥

निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले । निर्गुण सगुण त्याही गिळीयलें ॥३॥

चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका । वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP