मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
पाहतां पाहतां वेधियेला जी...

संत चोखामेळा - पाहतां पाहतां वेधियेला जी...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुख सिंधु पंढरीराव ॥१॥

माझा ही मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥

भवसागराचा दाता । विठ्‌ठल विठ्‌ठल वाचे म्हणतां ॥३॥

उभा राहुनि महाद्वारीं । चोखा मेळा दंडवत करी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP