मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
कोण तो सोंवळा कोण तो वोवळ...

संत चोखामेळा - कोण तो सोंवळा कोण तो वोवळ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


कोण तो सोंवळा कोण तो वोवळा ।

दोहींच्या वेगळा विठ्‌ठल माझा ॥१॥

कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥

पांचांचा विटाळ एकाचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥

चोखा म्हणे माझा विठ्‌ठल सोंवळा । अरुपें आगळा विटेवरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP