मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
जन्मांचें साकडें नाहीं मा...

संत चोखामेळा - जन्मांचें साकडें नाहीं मा...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


जन्मांचें साकडें नाहीं माझें कोडें । जेणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥

कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥

वैष्णवांचे द्वारीं लोळेन परवरी । करीं अधिकारी उच्छिष्‍टाचा ॥३॥

चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरीं पशुयाती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP