मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
काळाचा विटाळ जीवशिवा अंगी...

संत चोखामेळा - काळाचा विटाळ जीवशिवा अंगी...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


काळाचा विटाळ जीवशिवा अंगी । बांधलासे जगी दृढ गांठी ॥१॥

विटाळीं विटाळ चवदाही भुवनें । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥

सुखासी विटाळ दुःखासी विटाळ । विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥

विटाळाचें अंगी विटाळाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP