मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
अखंड समाधी होउनी ठेलें मन...

संत चोखामेळा - अखंड समाधी होउनी ठेलें मन...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


अखंड समाधी होउनी ठेलें मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥

विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥

चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥

चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणें तो विरळा लक्षामाजी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP