मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
भवाचिया भेणें येतों काकूळ...

संत चोखामेळा - भवाचिया भेणें येतों काकूळ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


भवाचिया भेणें येतों काकूळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥

पडीलोसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळीं देवराया ॥२॥

कवणाची आस पाहूं कोणीकडे । जीवींचें सांकडें वारीं देवा ॥३॥

गहिंवर नावरे चोखियाचे मनीं । धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP