मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
जनक तूं माझा जननी जगाची ।...

संत चोखामेळा - जनक तूं माझा जननी जगाची ।...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


जनक तूं माझा जननी जगाची । करुणा आमुची कां हो नये ॥१॥

कासया संसार लावियेला पाठीं । पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥

जन्म जरा मरण आम्हां सुख दुःख । पहासी कौतुक काय देवा ॥३॥

गहिंवरुनी चोखा उभा महाद्वारीं । विनवी जोडूनि करीं विठोबासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP