मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
आतां कणकण न करी वाउगी । ह...

संत चोखामेळा - आतां कणकण न करी वाउगी । ह...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥

दारीं परवरी झालोंसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥

होयाचें तें झालें असो कां उदास । धरोनियां आस राहों सुखी ॥३॥

चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे । न लावीं पिसें जीवा कांहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP