मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
बहु कनवाळु होसी गा देवराय...

संत चोखामेळा - बहु कनवाळु होसी गा देवराय...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


बहु कनवाळु होसी गा देवराया । म्हणोनि सखया शरण आलों ॥१॥

निवारीं या तापापासोनी सोडवीं । करूणा भाकावी किती तुम्हां ॥२॥

माझीयाचि काजा विलंब दातार । कां न करीं त्वरा देवराया ॥३॥

चोखा म्हणे बहु पडिलों काचणी । सोडवीं चक्रपाणी वेगीं आतां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP