मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
आतां याचा अर्थ पुरे पुरे ...

संत चोखामेळा - आतां याचा अर्थ पुरे पुरे ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आतां याचा अर्थ पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवळा तुम्हांलागीं ॥१॥

गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांहीं न चाले ॥२॥

वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवळा तुम्हांलागीं ॥३॥

चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावि आस मायबाप ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP