मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
धांव घाली विठु आतां चालू ...

संत चोखामेळा - धांव घाली विठु आतां चालू ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


धांव घाली विठु आतां चालू नको मंद । बडवे मज मारिती ऐसा कांहीं तरी अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला । शिव्या देती महारा म्हणती देव बाटविला ॥२॥

अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा । नकाजी मोकलू चक्रपाणी जिमेदारा ॥३॥

जोडूनिया कर चोखा विनवितो देवा । बोलिलों उत्तरें परि राग नसावा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP