मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
अगाध हे कीर्ति विठ्‌ठला त...

संत चोखामेळा - अगाध हे कीर्ति विठ्‌ठला त...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


अगाध हे कीर्ति विठ्‌ठला तुमची । महिमा आणिकाची काय सांगों ॥१॥

पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥

शेषादिकां जेथें न कळेचि अंत । तेथे मी पतित काय वानूं ॥३॥

चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार । कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP