मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
कोण माझा आतां करील परिहार...

संत चोखामेळा - कोण माझा आतां करील परिहार...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


कोण माझा आतां करील परिहार । तुज वीण डोंगर उतरी कोण ॥१॥

तूं वो माझी माय तूं वो माझी माय । दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥

बहुत कनवळा तुझिया गा पोटीं । आतां नको तुटी करुं सेवा ॥३॥

चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत । ठेवा माझें चित्त तुमचे पायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP