मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
इतकेंचि देईं रामनाम मुखीं...

संत चोखामेळा - इतकेंचि देईं रामनाम मुखीं...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


इतकेंचि देईं रामनाम मुखीं । संताची संगती सेवा सार ॥१॥

निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरीं सुख मज ॥२॥

उच्छिष्‍ट धणिवरी पोटभरी धाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥

चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळू देवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP