मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
कळेल तैसे बोल तुजचि बोलेन...

संत चोखामेळा - कळेल तैसे बोल तुजचि बोलेन...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥

काय करुं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥

कोठवरी धांवा पोकारुं केशवा । माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥

चोखा म्हणे आतां पुरे चाळवण । आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP