मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
दुःखरुप देह दुःखाचा संसार...

संत चोखामेळा - दुःखरुप देह दुःखाचा संसार...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


दुःखरुप देह दुःखाचा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥

कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती । दुःख होतां जाती आपोआप ॥२॥

सोइरे धायरे कवणाचे कवण । अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥

चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । सोडवीं भवपाशा पासोनियां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP