मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ८९

क्रीडा खंड - अध्याय ८९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

बालक गजाननाला, होतां दश-मास पूर्ण त्या समयीं ।

अजगर असूर दिसतां, जाइ गजानन त्वरीत त्या ठायीं ॥१॥

अजगर मुख पसरी तों, शिरला सत्वर तया मुखामाजी ।

उदर विदारुन झडकरी, पडला बाहेर तो प्रभू हो जी ॥२॥

एकादश मासांचा, होतां बालक करीत तो लीला ।

वाटे मोद जनांना, करिती कौतुक अगाध त्या लीला ॥३॥

शलभासुर तेथें कीं, गणपति वध इच्छुनी गृहामाजी ।

आला पाहुन बालक, पाठीमागें धरावया काजी ॥४॥

धरिला असूर लीलें, उपटी पंखांस बाल गमतीनें ।

चावे शलभासुर तो, आपटि त्याला धरुन जोरानें ॥५॥

प्राण तयाचा गेला, राक्षस झाला त्वरीत पूर्ववत ।

पाहति जन तेथींचे, कौतुक करिती शिशूस जें उचित ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP