मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ११७ - ११८

क्रीडा खंड - अध्याय ११७ - ११८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

सती दुर्गा ती नाथ खिन्न पाहे ।

तया संबोखी बोध करित आहे ॥

नका पीडूं कीं देवविप्रधेनू ।

शरण जावें त्या शिवा उमा-सोनू ।

जशी रुग्णासी औषधी रुचेना ती ।

सतीवाणी त्या रुचत नसे जी ती ॥

कथी प्रेमानें शुद्ध सरळ कांता ।

न जाणे तो असुर तिची वार्ता ॥२॥

करी आयति तो द्वितिय दिनीं सिंधू ।

कर्ण वेष्टुनियां सिद्ध होत युद्धू ॥

अती त्वेषानें ठरवि युद्ध द्यावें ।

कला विकलाला पाठवीत भावें ॥३॥

असुर होते ते मेहुणेच त्याचे ।

निघति युद्धासी सैन घेति त्याचें ॥

तयां वीरांसी पुष्पदंत नंदी ।

सिद्ध झाले ते शिरत रणीं संदी ॥४॥

उभय पक्षांचें घोर युद्ध झालें ।

पुढति नंदी त्या असुरदलीं चाले ॥

पाद शिंगांनीं पुच्छ तडाक्यांनीं ।

असुर वधिले ते बहुत विक्रमांनीं ॥५॥

परी कल नामें असुर पाश टाकी ।

धरी नंदीला बघुन वीर हें कीं ॥

दलीं सेनानी वीरभद्र यांनीं ।

बहुत शूरत्वें समर करित दोनी ॥६॥

घेति प्राणासी संगरीं कलाच्या ।

सदनिं विकलासी पाठवी यमाच्या ॥

पुढति वधिती ते असुर रणीं वीर ।

पळति समरांतुन असुर बहुवीर ॥७॥

म्हणून झालें तें युद्ध पुरें शांत ।

कळलि सिंधूसी समरिं घडे मात ॥

कथी व्यासासी युद्ध सुधासिंधू ।

अणखि युद्धासी करिल बरें सिंधू ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP