मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ९१

क्रीडा खंड - अध्याय ९१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

दोन वर्षें हीं होत गणेशासी ।

वधी बालक त्यां असुर बहू राशी ॥

निघे उद्यानीं खेळण्यास लीलें ।

तयासंगें कीं मित्र फार आले ॥१॥

तिथें कूटासुर येत धरुन आस ।

वधूं आपण तो बाळ तरी खास ॥

करी कासारीं मिश्र विष दुष्ट ।

साध्य होइल तें कार्य खरें इष्ट ॥२॥

लपुन बैसे तो कूट तिथें व्यासा ।

बघे दृष्टीनें करुन कृत्य खासा ॥

बहू क्रीडेनें थकुन तोक येती ।

करित प्राशन तें उदक यथामीती ॥३॥

उदक पानानें तोक गार झाले ।

कळे वृत्तासी सकल लोक आले ॥

तिथें झाला तो कहर बहू त्यांचा ।

सुधा दृष्टीनें बघत पूर्ण साचा ॥४॥

उठवि तोकांसी मुदित लोक झाले ।

कुपित दृष्टीनें असुर भस्म केलें ॥

पुढति आश्रमिंच्या समिप नदीतीरा ।

जात गणपति तो पुढिल वृत्त हेरा ॥५॥

नदीमाजी तो गिरिशसूत लीलें ।

ऋषी सूतांनीं गमन तिथें केलें ॥

तोंच राक्षस कीं धरित मत्स्यरुप ।

नदीमाजी तो नेत विश्वरुप ॥६॥

कथिति गिरिजेला वृत्त मुनीसूत ।

पडे मूर्च्छित ती माय कीं त्वरीत ॥

वधित इकडे तों गणपती मुरासी ।

त्वरित आला तो गणपती तिरासी ॥७॥

कथिति वृत्ता या शेष मुनीसूत ।

बहू हर्षित कीं गिरिशसती होत ॥

पुत्रचापल्या बघुन तीस वाटे ।

तया शासन कीं करित बहू नेटें ॥८॥

तया धरण्यासी जात उमा पाठीं ।

तुरी देऊन तो पळत दारवंटीं ॥

पळत असतां ती धरित गणेशासी ।

नाम कर्दम हें असुर असे त्यासी ॥९॥

तिथें आला तो हनन करायासी ।

गिळित सत्वर की असुर गणेशासी ॥

होत वर्धित तो असुर बहू थोर ।

त्वरित काढी त्या वदन बाह्य मूर ॥१०॥

त्यास घेउनियां चालतसे जेव्हां ।

होत गणपति त्या परिस थोर तेव्हां ॥

तया असुरासी पादतळीं तूर्ण ।

दडपि तेव्हां तो असुर होत पूर्ण ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP