(गीति)
त्याच्याबरोबरीचे, राक्षस होते समुद्रसांख्येय ।
गंधासुर मदनासुर, वीरध्वज शार्दुला महाकाय ॥१॥
निर्मित राक्षस समरीं, सप्तव्यूहते करावया युद्ध ।
व्यूहा भेदायाला, शिवगण येती सशस्त्र ते सिद्ध ॥२॥
बिकट चपल गणनंदी, दंत षडानन अणीक भुतराज ।
समराख्य वीरभद्रहि, भेदित व्यूहास तेधवां सहज ॥३॥
दोन्ही सेना लढल्या, भीषणशा वाटती बघायास ।
राक्षस शिवदल लक्षुन, शीलांचा वर्ष्तीच पाऊस ॥४॥
शिवदल शरजालानें, परतविति त्या शिला मुरावरती ।
ऐशा रीती युद्धीं, राक्षसदल नाशिलें रणावरती ॥५॥
नंदीनें मुरसेना, संहारुन कीं जयास मिळवीलें ।
जयवाद्यांच्या गजरें, मयुरेशाच्या जयास कळवीलें ॥६॥
जयजयकारें गर्जति, मयुरेशाच्या त्रिवार नामांनीं ।
झालें रणरंगीं हें, दारुणसें युद्ध फार शौर्यांनीं ॥७॥