मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १०४ - १०५

क्रीडा खंड - अध्याय १०४ - १०५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

व्यासास विधी सांगे, त्या समयीं गुप्तरुप मी गेलों ।

गणपतिदर्शन घेउन, मजसी वाटे खरोखरी चुकलों ॥१॥

कारण कुमार आहे, आचरणांनीं बहुतसा भ्रष्ट ।

यास्तव माझें झालें, ज्ञान तसें नी महत्त्वही नष्ट ॥२॥

वाटे मला म्हणूनी, कळलें सारें पुरास मी नुरवीं ।

जाणून गजाननानें, मायेनें सर्व निर्मिली उरवी ॥३॥

माझा गर्व तिथेंची, गेला म्हणुनी क्षमा तया मागें ।

मजला गर्व न व्हावा, ऐसा वर मी तयास मग मागें ॥४॥

(वसंततिलका)

एके दिनीं नगरिं त्या घडला प्रकार ।

बैसे उमा नगरिं त्या सदनीं दुपार ।

होता सख्या समय तो तरि भोजनाचा ।

आला तिथें अतिथि विप्र श्रमून साचा ॥५॥

नामें असे हरि-उपासक विश्वदेव ।

घेई अपोशन करीं मग विश्वदेव ।

तों त्यास कीं स्मरण हो हरिदर्शनाचें ।

प्राशावयास हरितीर्थहि मुख्य साचें ॥६॥

बैसे सचिंत बहु शांत सुपूर्णभक्ती ।

जाणे गजानन तदा मग भोजनांतीं ।

त्यानें स्वरुप तदनंतर गुप्त केलें ।

विष्णुस्वरुप धरुनी तयिं दाखवीलें ॥७॥

विष्णू गणेशमधिं तो नच भेदभाव ।

दावी तयास करुनी मग एक भाव ।

होतांच भोजन तया मनिं भेद जाया ।

दावी गजानन तयिं एक माया ॥८॥

होता वशिष्ठ नगरीं मुनि एक मित्रा ।

त्याचा असे सुत तया सुत एक मित्रा ।

नामीं पराशर कुमार लहान होता ।

भावें गजानन यजनीं तयिं गुंग होता ॥९॥

अर्पी प्रभूस करिं शुष्क सुपर्णमाला ।

चर्चीत रक्तसम चंदन हें कपाळा ।

नैवेद्य तो करित मोदक मृत्तिकेचे ।

भक्षी प्रभूस वदला धरि हट्ट वाचे ॥१०॥

त्याचा बघून बहु भावचि मृत्तिकेचा ।

भक्षी गजानन सजीवचि होत साचा ॥

झाले समस्त उपचारचि ते खरे कीं ।

सेवी गणेश मग ते सगळे स्वयें कीं ॥११॥

पाहे प्रकार सगळा तड विश्वदेव ।

पाहे क्षणांत हरि विप्र गणेशदेव ।

ऐसें दिसे उभय तें बहु आळिपाळी ।

झाला मनीं द्विज तदाच अभेद वेळीं ॥१२॥

झाला त्वरीत मग तो द्वय साम्यभाव ।

विष्णू गणेश असती द्वय एकभाव ।

झाला सुपूर्ण शरसंख्य उपासनेचा ।

येथेंचि खंड दुसरा कवनेंचि साचा ॥१३॥

सांगे मुनीस विधि हा कथि त्या वनांत ।

ऐके नृपाळ बसुनी भृगु आश्रमांत ।

सेवा म्हणूनि करि काव्य विभूकृपेनें ।

अर्पी सुरक्त सुमनें बहु आवडीनें ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP