मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ९५

क्रीडा खंड - अध्याय ९५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

शास्त्रामित वर्षांचा गिरिजासुत होत तेधवां येई ।

भेटीस विश्वकर्मा, शंभूच्या आश्रमीं त्वरित येई ॥१॥

पाहे गजाननाला, तोकांसह आश्रमीं स्तवि त्यास ।

ठेवी तयापुढें तीं, पाशांकुशपरशुपद्म भेटीस ॥२॥

केलीं ग्रहण तयानें, सायुध झाला पुसे तया काय ।

हीं तूं कोठुन केलीं, संपादन सांगसी मला काय ॥३॥

माझी सुंदर कन्या, अर्पी रविला यथाविधी लग्नें ।

रवितेज साहवेना, अश्वी झाली लपे वनीं स्वमनें ॥४॥

नंतर रवीस वदलों, जरि तूं तेजा कमी करी अपुल्या ।

तरि तीस आणितों मी, जाउन वनिं येधवां इथें ठायां ॥५॥

यंत्रीं घांसुन अपुलें, तेज कमीसें करी रवी मग तो ।

झाला अश्व रवी मग, गेला सतिच्या समीप सत्वर तो ॥६॥

घडतां सुसंग दोघां, त्यांपासुन यमल जाहलें देवा ।

अश्विनिकुमार वदती, त्या यमलाला प्रथीत या नांवा ॥७॥

रविचा कीस आणुनी, केलीं अयुधें स्वतां करीं मीही ।

चक्र गदा हीं दिधलीं, विष्णूला त्रिशुल शंभुला पाही ॥८॥

बाकी अर्पण केलीं, अपुल्याला हीं बहूत आवडिनें ।

अभिवंदन हें केलें, धारण केलीं त्वरीत त्या प्रभूनें ॥९॥

नंतर गणेश गेला, खेळाया तो तिथून बाहेर ।

बाळांसहीत जेथें, आला तों दैत्य तेथ तो हेर ॥१०॥

वृक नटला भीषणसा,हिंस्त्र पशु लांडगा तिथें त्वरित ।

गेला गजाननाच्या, अंगावरि धाउनी त्वरें खचित ॥११॥

गणपति अंकुश मारी, झाला प्राणान्त तेधवां त्याचा ।

ऐके गजाननाचा, विक्रम व्यासा शिशूपणीं साचा ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP