(गीति)
दुसरे दिवशीं नंदी, भृंगी भुतराज आणखी वीर ।
तैसेच पुष्पदंतहि, भीषणसा वीरभद्र अनिवार ॥१॥
सैन्यासहीत शिवगण, गंडकि नगरीं समीप ते आले ।
तिकडुन असूर दलही, सज्ज असे संगरांत ते आले ॥२॥
युद्धारंभ सुरु हा, असंख्य राक्षस शिवादळीं वधिला ।
सिंधूस मात कळली, वाजीवरि बैसुनी रणीं आला ॥३॥