लावणी १८ वी - जिव तिळ तिळ देते सख्या तु...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
जिव तिळ तिळ देते सख्या तुसाठीं ॥धृ०॥
शुद्ध भाव माझा, पाईं प्रीत पणाची
भरावया आलि नवती पहिल्या शिणाची
सय घडोघडि होते तुमच्या गुणाची-समयानें गांठी ॥१॥
अढळ पुण्ययोगे आपल्या गडया या पडाव्या
भगीरथ यत्न आमच्या तुमच्या गोष्टी घडाव्या
आतां उभयपक्षीं पुरत्या ममता जडाव्या-जेउं एकताटीं ॥२॥
तुझ्या भेटीसाठी मोठी घार होते मी
आडजुड ठाइ ठाइ उभी राहते मी
दिसामधुन लाखो वेळ मुख पाहते-मी लागते पाठीं ॥३॥
हार कंठिंचा मी म्हणते प्राण जिव्हाळा
आधिं घेतला हो, येवढा भार सांभाळा
नित्य जवळ गाणें गाती होनाजी बाळा- बरी साधी धाटी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP