लावणी १०९ वी - दे गा पायीं जागा पंढरीच्य...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
दे गा पायीं जागा पंढरीच्या पांडुरंगा ।
शरण तुला मी आलों अरे जगदीशा ।
सोडवी मजला भक्त-भव-भंगा ॥१॥
मंत्रहीन क्रियाहीन दीन देवा ।
कृपा करी रुक्मिणीच्या मानस रंगा ॥२॥
जडमूढ उद्धरिले पतित जनाला ।
माझी नये करुणा कैशी तुजला अभंगा ? ॥३॥
धावण्या द्रौपदिच्या हरि धावलाशीं ।
पुरवुन वस्त्रें तेथें झाकिलें अंगा ॥३॥
म्हणे गंगु हैबती क्षमा करी आतां ।
महादेव गुणी लीन स्मरणीं प्रसंगा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP