लावणी १११ वी - रात्रीं तळमळते, छपरपलंगीं...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
रात्रीं तळमळते, छपरपलंगीं नीज य़ेईना ॥धृ०॥
चिरली काचोळी कुसुंबी दंडीं अवचित उर पहातां ।
अपुल्या अपुणच तुटली गुंडी पलंगावर बसतां ।
पडते पहाटेची गुलाबी थंडी संनिध पति असतां ।
जातो नित रूसुन परके ठाई भोगावे कुणी दावा ।
-ये समई प्राणविसावा, कळ साहिना ॥१॥
सगळे मखमुली बिच्छोने महालीं करउम मी नटलें ।
वरती मऊ असुन परांची न्याहाली तडफडुन उठले ।
पहातां सदनाकडे तलखी जाहाली, पाझरहि सुटले ।
फिटलें नेसूचें ग लुगडें सारे कापिले असे,
नाहीं धीर, जाहले अधीर अशी, जीव जाईना ॥२॥
पहिल्या रंगाची ऐन अमदानी, पुरवावी हौस ।
चौदा वर्षांची उमर भर नवती, भोगाचे दिवस ।
तिंदा मज टाकुन जातो तो भुवनीं, बाहेरला सोस ।
देई मुखचुंबन प्राणविसावा, आणु बळे अविलिंबे घडवी --
येकांत आनंदाखालीं मला राहावेना ॥३॥
रात्रा तडफडती उरली थोडी, निर्दय तो पुरता ।
आतां काय घेऊन निजाची गोडी श्रमले चुरमुरतां ।
गंगु हैबती म्हणे चीर फेडी, बस चढुन वरता ।
गाती महादेव प्रभाकर इलमी कुणा भेइना ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP