हा मिठा नवतिभर लुटा, उठविते उठा, उशिर जाहला ॥धृ०॥
वाचवा प्राण लाघवा (?), दिवस पांचवा, आज मी नाहाले ।
बोधितां, लक्ष वेधितां, करून सिद्धता एकांतीं आलें ।
धरिते पाय, द्यावा ठाय, असे अन्याय काय तरि झाले ?
बालाग्र मात्र संशय नसता ठेविला
घेतला हट्ट जो तो पदार्थ देविला
नाना प्रकार आजवर प्रसंग सेविला
पावला, देव धावला, परिस घावला, घेतला लाहो ॥१॥
हो हे (?) डाग लागली, अंगविषय महा वाघ लागला पाठीं ।
गरगरा पाहतां भिरभिरा अले परघरा मि तुमचेसाठी ।
मुकवितां मला दुखवितां, कसे चुकवितां लिखित लल्लाटीं ? ।
ह सिद्ध योग, मी दुर्धर तप वर्तले
सर्वांगीं शुद्ध, पदिं लोटांगण घातलें
शिखर नयनीं जणुं पाहतां मन शांतलें
गुंतले, हें फल जिंतले, काय चिंतले ? मशिं बोला हो ॥२॥
ऋतुबहार चालला प्रहर, जसा विष जहर, डोम शरिराचा ।
करुं कसा धीर करुं ? कसा शीण हरुं ? कसा मदन कहराचा ।
आटतो, कंठ दाटतो, तेव्हां वाटतो समय वैर्याचा ।
अपरात्र जाली तळमळ करिते उठबशा
कामांत अतुर हा जीव घाली धापशा
परदु:ख शितळ या तुमच्या गोष्टी अशा
घ्या निशा, नका करूं दशा, राग तर कशावरून आला हो ? ॥३॥
मशि आढा कां हो येवढा ? देतसे विडा, आतां समजावें ।
मी पुढें आडवी पडे, विरह साकडें कांहिं उमजावें ।
शेवटीं व्यापिले मोठी, अशा संकटीं कसे गांजावें ? ।
उभयतां मिळाला मग संगम छातिचा
जाहला शितळा मायानळ त्या धातिंचा (?)
होनीजी बाळा म्हणे, धन्य भाव हो तिचा
शर्तिचा पूर भरतिचा, मोहज्वर तिचा सुखी धाला हो ॥४॥