मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
आजि कां गे रुसलीस ? सांग ...

लावणी १२० वी - आजि कां गे रुसलीस ? सांग ...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


आजि कां गे रुसलीस ? सांग सुंदरी । बोले हसुन, चाले थटुन राजमंदिरीं ॥धृ०॥

कुरळ केश विस्कळीत जाहाले कां गडे ? । माझी आण तुला सखे, तू पाहे मजकडे । सुरत तुझी पाहूनि मला लागले वेडें । नित्य येतां हसुनि मशीं बोलशी बरी ॥१॥

तुझे प्रीतीची मला आवड फार गे । तुझेसारिखी दुजी नाहीं नार गे । वय वरुषें पंधरांत सकुमार गे । रसति गेंद भरून आले ते उरावरी ॥२॥

आज काय चुक जाहाली ? सांग साजणी । रात्रीमधीं येणें जाहालें, रुसशी म्हणउनी । ऋतुस्नात होति माझी घरिं कामिनी । अंतर हे पडलें सखे तुं क्षमा करी ॥३॥

नेसुनि शेलारी लाल कंचुकी । रत्नखचित नग प्रकार परोपरिचे कीं । नेला सखा मंदिरांत, बसला मंचकीं, । गातो फंदी छंद कटिबंद हे करी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP