लावणी ९५ वी - घ्या गोविंदविडा तुम्ही सज...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
घ्या गोविंदविडा तुम्ही सजणा ।
न्हाण आल्यास झाला येक महिना ॥धृ०॥
उभी केव्हांची द्वारी सजणा, मजकडे कां हो पहा ना ? ।
तुझ्या सुरतीला लंपट झाले, कळ मजला साहिना ।
सख्या आंगासी घर्म सुटलें, मांडीवर कां घ्या ना ? ॥२॥
कडेवर घेतां, मांडीवर न्हेता, हात बगलेंतुन द्या ना ।
उजव्या हस्तें गेंद चोळितां, मुखचुंबन कां घ्या ना ॥३॥
संगामध्ये रंग उडविला, रिझली राघूमैना ।
सगनभाऊ म्हणे, गंमत झाली सांगा लक्षुमणा ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP