धर्मोपमानलुप्ता, वाक्यांत व समासांत अशा दोन ठिकाणीं होते, म्हणून सांगितलें. पण तो प्रकार ‘ यच्चोराणम् ’ इत्यादि श्लोकाच्या तिसर्या चरणांत सांगितलेला साधारण धर्म काढून टाकल्यास ( व नवा चरण बन-बिल्यास ) छ प्रत्ययाच्या अर्थातही दिसतो.
वाचकधर्मलुप्ता, क्किप् व समास ह्या दोन ठिकाणीच हाते, असें ( आम्ही ) मागें सांगितलें होतें, पण “ चञ्चा पुरुष: सोऽयं योऽत्यन्तं विषय-वासनाधीन: ” [ विषयवासनेच्या अत्यंत आहारीं गेलेला जो पुरुष असतो तो ( गवताच्या पेंढ्याचा बनवलेल्या शेतातल्या ) माणसाच्या आकृतीचें बुजगावणेंच असतो, ’ ( निर्जीव बुजगावण्य़ासारखाच असतो, ) ] या आर्या-र्धातहि ‘ स्वत:च्या हिताची गोष्ट न करणें ’ हा ( साधारण ) धर्म सांगि-तला नसल्यानें , व कन् प्रत्ययाचा लोप झाला असल्यानें, वाचकधर्मलुप्ता हा प्रकार झाल्याचें दिसतें. अशा रीतीनें उपमेचें ( एकंदर ) बत्तीस प्रकार ( सांगून ) झाले. ह्या ठिकाणीं पुढील गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे:-कर्म व आधार क्यच् आणि क्यड् या प्रत्ययांत वाचकलुप्ता उपमा होते, असें सांगून आधार क्यच् आणि क्यड् या प्रत्ययांत वाचकलुप्ता उपमा होते, असें सांगून त्याचें उदाहरण जें प्राचीनांनीं दिलें आहे, तें ( आम्हांला ) असंगत वाटतें. कारण कीं, ह्या उदाहरणांत धर्मलोपहि संभवतो. कुणी म्हणतील कीं, क्यच् वगैरेचा अर्थ जो आचार तो ( येथें ) साधारण धर्म आहे, ( मग तुम्ही येथें धर्मलोप हि संभवतो, असें कसें म्हणतां ? ) यावर आमचें उत्तर हें कीं, येथें आचार हा केवळ नांवाचाच साधारण धर्म आहे. ( खर्या अर्थानें तो साधारण धर्म नाहीं. ) म्हणूनच तो उपमेला साधक होऊ शकत नाहीं. ‘ नारीयते सपत्नसेना ( शत्रूंची सेना बायकांसारखी वागते ) ह्या क्यड्च्या रूपांत असलेला आचार हा साधारण धर्म घेऊन ह्या वाक्यांत उपमा सिद्ध झालेली नाहीं. पण ( अभिधेहून निराळ्या व्यञ्जना-वृत्तीनें सूचित केलेल्या ( अथवा लक्षणावृत्तीनेंही आक्षिप्त केलेल्या ) ‘ घाबरटपणा ’ वगैरे धर्माशीं अभिन्न स्वरूपाचा मानलेला आचारच येथें उपमेची सिद्धि करतो. क्यड्चा अर्थ जो आचार तोच केवळ उपमा साधणारा असेल तर, ‘ त्रिविष्टपं तत् खलु भारतायते’ ( तो स्वर्ग खरोखरी महाभारतासारखा वाटतो. ) वगैरे वाक्यांत ‘ सुप्रसिद्ध असणें ’ इत्यादि प्रकारचा अथवा स्वरूपाचा आहार हा साधारण धर्म घेऊन येथें उपमा साधता आली असती; पण ती तशी मुळींच साधतां येत नाहीं. कारण कीं, ‘ सुपर्वभि:शोभितमंतराश्रितै: । ’ ( स्वर्ग, त्यांत आश्रयार्थ राहणार्या देवांनीं शोभित झालेला आहे; आणि महाभारतही, त्यांतील सुंदर (१८) पर्वांनी सुशोभित झालेलें आहे । हा दुसरा एक चरण, वरील चरणाच्या जोडीला घालावा तेव्हांच , ‘ सुपर्वभि शोभितं: ’ हा साधारण धर्म मिळून उपमा सिद्ध होते. तेव्हां ( सांगावयाची गोष्ट अशी कीं, ) क्यड्चा अर्थ आचार साधारण धर्म असल्यासारखा दिसला तरी, तो उपमा तयार करू शकत नाहीं. एखादा साधारण धर्म, असल्यासारखा दिसला तरी, तो उपमा तयार करू शकत नाहीं. एखादा साधारण धर्म, तो हमखास उपमेला तयार करणारा आहे, अशी प्रसिद्धि असूनही त्या ( साधारण धर्मा ) ला प्रत्यक्ष सांगणारे शब्द वाक्यांत नसतील तेव्हांच, ( त्या उपमेच्या उदाहरणांत, ) धर्मलोप झाला आहे असें म्हणतां येते. ( व धर्मलोप शब्दाचा खरा अर्थ हाच. ) ही गोष्ट जर मान्य केली नाहीं तर ‘ मुखरूपमिदं वस्तु प्रफुल्लमिव पंकजम् ’ ( फुललेल्या कमळाप्रमाणें ही मुखरूपी वस्तु आहे. ) ह्यासारख्या ठिकाणींही पूर्णोपर्मो मानण्याची वेळ येईल . अशा रीतीनें थोडक्यांत हा विषय सांगून झाला.