‘ अरविंदवत् सुंदरम् ’ ह्या वाक्यांत, जो वत् प्रत्यय आलेला आहे, त्याचा अर्थ, ‘ सादृश्यवत् ’ असा होतो. व हा, वत् ह्या प्रत्ययाचा अर्थ, ‘ तेन तुल्यं क्रिया चेद्वति: ’ ( पाओ ५।१।११५ ) ह्या पाणिनिसूत्राप्रमाणें झालेला आहे. परंतु, ह्या ठिकाणीं, सादृश्यवत् ह्याची सादृश्य ह्या अर्थावर लक्षणा करावी व नंतर सुंदर ह्या पदाचा एक अंश जो सौंदर्य त्याच्याशीं, त्या सादृश्याचा अन्वय करावा; म्हणजे वरील वाक्याचा शाब्दबोध, ‘ अरविंदभिव सुंदरम् ’ ह्या मागें आलेल्या वाक्याप्रमाणें होऊं लागेल. ( फक्त ह्या दोन वाक्यांच्या शाब्दबोधांत, फरक एवढाच कीं, ) ‘ अरविंदमिव ’ ह्यांतील इव पदाचा सादृश्य हा अर्थ, अभिधेनें हातीं आलेला आहे; पण, वत् चा सादृश्य हा अर्थ, लक्षणेनें प्राप्त झाला आहे. आणि म्हणूनच
इवादि-युक्त वाक्यांतील उपमा श्रौती होते, तर ह्या वत्प्रत्यययुक्त वाक्यांतील उपमा आर्थी होते.४
‘ अरविंदवन् मुखम् ’ ह्याचा शाब्दबोध , ‘ अरविंदानें निरूपित जें सादृश्य त्यानें युक्त असलेल्या पदार्थाशीं अभिन्न असें मुख ’ असा होतो. आतां, ‘ अरविंदवत् सौंदर्यमस्य ’ ह्या वाक्यांत, प्रथम अरविंद शब्दावर लक्षणा करून, त्याचा ‘ अरविंदाचें सौंदर्य ’ , असा अर्थ घ्यावा. आणि नंतर, ‘ अरविंदाच्या सौंदर्यामुळें उत्पन्न होणारें जें सादृश्य, तें राहण्याचें स्थान, ह्याचें ( मुखाचें ) सौंदर्य आहे ’ , असा, मुख व अरविंद ह्यांच्यांतील दोन सौंदर्यांमध्ये सादृश्य आहे असा शाब्दबोध होऊन त्यानंतर, हीं दोन्हीं सौंदर्यें अभेदाध्यवसायानें, एकच साधारणधर्म आहे, असें मानून, तन्मूलक
मुख वं अरविंद ह्या दोहोंमध्ये सादृश्य आहे असा शाब्दबोध शेवटीं होतो. ‘ अरविंदने तुल्यम् ’ ह्या वाक्यांतील तृतीयेचा अर्थ , ‘ त्यामुळें झालेलें ’ असा आहे. व त्या निरूपितत्वाचा अन्वय सादृश्याशीं करून, अरविंदानें निरूपित जें सादृश्य त्याच्या आश्रयाशीं अभिन्न असा या वाक्याचा शाब्दबोध होतो.
आतां वरील वाक्यांत, ‘ सौंदर्येण ’ ( असें एक नवीन पद घालून त्यानें ) समानधर्माचा निर्देश केल्यास, सौंदर्येण ह्यांतील तृतीयेचा अर्थ, ‘ सौंदर्यामुळें उत्पन्न झालेलें ’ असा होईलं; व मग, अरविंदानें निरूपित जें सौंदर्य, त्यानें उत्पन्न होणारें जें सादृश्य, त्यानें युक्त असलेल्या पदार्थांशी अभिन्न ’ , असा ह्या ( नव्या ) व्याक्याचा शाब्दबोध होईल.
( आतां, शेवटीं, ) ‘ अरविन्दमाननं च समम् ’ ह्या वाक्यांतील समम् ’ ह्या वाक्यांतील समम् या शब्दाचा सादृश्ययुक्त असा प्रथम अर्थ होतो; आणि मग, ‘ सादृश्ययुक्त पदार्थाशी अभिन्न ( आनन ) असा त्या वाक्याचा शाब्दबोध होतो. आणि नंतर मानसिक प्रतीति अथवा व्यंजनाव्यापारानें होणारी प्रतीति झाल्यानें, ‘ अरविंद व आनन ह्या उभयतांनीं ( परस्परांनीं ) निरूपित झालेलें सादृश्य ’ असा अर्थ होईल; किंवा ‘ उपमान म्हणून प्रसिद्ध असणारे जें ( अरविंद वगैरे ) त्यानें निरूपित मादृश्य ’ अस वरील वाक्याचा शाब्द बोध होईल.