उपमालंकार - लक्षण ३७
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां, वर जें इव, वा इत्यादि सादृश्यवाचक शब्द सांगितले, त्यांच्या बाबतींत वैयाकरणांचे मत असें:-
उपसर्गांना द्योतक मानणें आवश्यकच आहे; कारण त्यांना द्योतक न मानलें तर ‘ उपास्यते गुरु: ’ ( गुरूची उपासना केली जाते. ) ‘ अनु-भूयते सुखं ’ ( मुख अनुभविलें जातें. ) इत्यादि वाक्यांमध्यें, गुरु, सुख वगैरेंचा कर्म म्हणून, कर्मणि क्तियापदांच्या यत् ( य ) प्रत्ययानें उल्लेख होणार नाहीं; कारण कीं, वरील वाक्यांतील गुरु व सुख या दोन कारकांचें उपास्यते व अनुभूयते यांतील लट् लकारांनीं कर्म म्हणून अभिधान होणार नाहीं; कारण तीं धात्वर्थाचीं कर्मेंच असणार नाहींत ( तीं आतां उपसर्गांचीं कर्में होणार० ) ( पण अशा रीतीनें उपसर्गांना द्योतक मानणें भाग असलें तरी, ) इवादिकांना वाचकच मानावें; तसें न मानायला कारण होणारें एकही बाधकप्रमाण ( अनुपपत्ति वगैरे ) नाहीं; आणि ‘ इवादिकांना उप-सर्गाप्रमाणेंच द्योतक मानावें; ( कारण दोन्हींही निपात आहेत ) हा जो पूर्वीं त्यांना द्योतक मानायला ( निपातत्व हा जो ) हेतु दिला होता, तो, निष्फळ आहे, ( तो हेतु होऊच शकत नाहीं ) कारण निपात म्हणून इवादींना जर द्योतक म्हणत असाल तर, तमाम अव्ययांना द्योतक म्हणायची पाळी येईल. ”
आतां, ह्या उपमेंतील चमत्काराचा अपकर्ष करणारे जे जे प्रकार असतील त्या सर्वांना दोष म्हणावें. त्यापैकीं उपमादोष म्हणून कांहीं पुढें सांगितले आहेत. ) (१) कविसमयप्रसिद्धि नसणें (२) उपमान व उप-मेय ह्या दोहोंचें जातीच्या बाबतींत आनुरूप्य नसणें. (३) प्रमाणाच्या बाबतींत आनुरूप्य नसणें. (४) लिंगाच्या बाबतींत आनुरूप्य नसणें (५) संख्येच्या बाबतींत आनुरूप्य नसणें. (६) बिंबप्रतिबिंबभावावर आधारलेल्या उपमेंत उपमान व उपमेय ह्यांच्यामधील परस्परांच्य़ा धर्मांत कमीपणा असणें. (७) अथवा अधिकपणा असणें. (८) अनुगामी धर्म असलेल्या उपमेंत साधारण धर्माचें कालाचे बाबतींत न जुळणें. (९) किंवा पुरुषाचे बाबतींत न जुळणें (१०) किंवा विध्यर्थांचे बाबतींत न जुळणें ( इत्यादि उपमेचे दोष समजावें. )
आतां वरील सर्व उपमादोषांचीं, क्तमानें उदाहरणें हीं:-
“ हे सुंदरी, तुझी मुखशोभा प्रफुल्ल कल्हाराप्रमाणें आहे, तुझ्या अधरोष्ठाचा रंग केशराप्रमाणें रम्य आहे, आणि तुझी अत्यंत शुद्धवाणी कापरांच्या वडयांच्या चवडीसारखी वाटते ” ( येथें कविसंकेताप्रसिद्धि-दोष आहे. )
“ हा ऋषि पृथ्वीवर भटकत असतां कुत्र्यासारखा भासतो. ” ( हा जाति-आनुरूप्याभावरूप दोष )
“ हा कुत्रा, ह्याला कांहीं एक करण्यासारखें उरलें नसल्यामुळें लोकांत महात्मा शुकदेवाप्रमाणें दिसतो. ” ( हाही जातीच्या आनुरूप्याच्या अभावाचा दोष )
“ सरोवरामध्यें अगदीं पिकलेलें हें लिंबू, तरंगत असतां, सृष्टीच्या उत्पत्तीचें मूलकारण असलेला जो जलौघ त्यावर तरंगत असलेल्या ब्रह्मांड-मंडलाप्रमाणें शोभत आहे. ” ( येथें प्रमाणाचें आनुरूप्य नसणें हा दोष. )
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP