उपमालंकार - लक्षण १३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


( आतां ) अप्पय दीक्षितांनीं ह्याच उपमाप्रकरणांत जें म्हटलें आहे कीं-
“ धर्मलुप्ता, वाक्य, समास व तद्धित व तद्धित ह्या तीन ठिकाणीं होत असलेली आम्हीं दाखविली; पण ती द्विर्भावाच्या ठिकाणींही दिसून येते. उदाहरणार्थ, ‘ पटुपटुर्देवदत्त: ’ ( देवदत्त चतुर पुरुषासारखा दिसतो. ) ह्या ठिकाणीं, “ प्रकारे गुणवचनस्य ” ह्या सूत्राप्रमाणें, सादृश्य या अर्थीं पटु ह्या शब्दाचा
द्विर्भाव झाला आहे? ( व ‘पटु’ चा अर्थ ‘ पटु ’ सारखा हा आहे ) ” ह्या त्यांच्या म्हणण्यांत कांहींच अर्थ नाहीं. कारण कीं , ह्या ठिकाणीं ‘ पटुपटु: ’ ह्यांतील सादृश्यवाचकाचाही लोप झाला असल्यानें, वाचकधर्मलुप्तेच्या प्रका-रांत हा आणखी एक प्रकार घालणेंच योग्य होईल. धर्मलुप्तेचाच आणखी एक प्रकार आहे, असें म्हणणें योग्य होणार नाहीं. धर्मलुप्ता म्हणजे केवळ धर्मलोप असलेली उपमा ” हाच अर्थ सांगणें अप्पय दीक्षितांना इष्ट आहे. ( हें उघड आहे. ) असें नाहीं मानलें तर, एकलुप्ता उपमा ह्याचा अर्थ द्विलुंप्ता असाहि घ्यावा लागेल; आणि मग त्या तिन्ही लुप्ता उपमानां निराळें सांगणें जुळणार नाही. आतां त्यांच्या बाजूनें कुणी म्हणतील कीं, “ पटुपटु: हा पटु शब्दाचा झालेला द्विर्भाव ( पुनरावृत्ति ) हाच सादृश्याचा वाचक असल्यानें, ह्या ठिकाणीं वाचकलोप मुळींच नाहीं; फक्त येथें धर्मलोपच आहे. ” पण त्यांना तसें म्हणतां येणारे नाहीं. कारण कीं, द्विर्भावाला सादृश्याचें वाचक म्हणणें, हें भाष्यकार पतंजल, कैय्यट वगैरेंच्या विरुद्ध आहे. कैय्यटानें, ‘ प्रकारे गुणवचनस्य ’ ह्या सूत्रावरील पतंजलीच्या महाभाष्यामधून ‘ सिद्धं तु० ’ हे प्रारंभींचे शब्द घेऊन, त्यावर विवरण करतांना म्हटलें आहे कीं, ‘ द्विर्वजन म्हणजे द्विर्भाव ह्याची जी प्रकृति म्हणजे मूळ ( पटु ) शब्द त्याला ( शास्त्रीय परिभाषेंत ) स्थानी म्हणतात. [ म्हणजे पटुपटु: ह्या द्विर्भावाची प्रकृति म्हणजे मूळ शब्द पहिला पटु ह्यालाच स्थानी म्हणावें. ] ( आतां सूत्रांतील ‘ गुण ’ हा शब्द सूत्रांतील प्रकार शब्दाचें विशेषण आहे का दुसर्‍या कशाचें विशेषण आहे, असा प्रश्र उपस्थित करून, स्वत: कैय्यटच त्याचें उत्तर देतो. ) ह्या  ( वरील ) स्थानीचेंच, ‘ गुण ’ हा शब्द विशेषण आहे असें मानलें पाहिजे ( म्हणजे गुण ‘ हें पटु’ चें विशेषण मानलें पाहिजे. ) गुण शब्दाला सूत्रांतील प्रकार ह्या शब्दांचे विशेषण मानतां येणार नाहीं. कारण कीं, प्रकार म्हणजे सादृश्य, हें स्वभावत:च गुणरूप आहे; म्हणून त्याला गुणवाचक सादृश्य असें म्हणण्यांत कांहींच स्वारस्य नाहीं. प्रकार म्हणजे ( येथें ) सादृश्य, नेहमींच सर्वत्र गुण-स्वरूप असल्यानें, त्याला गुण हें विशेषण न लावलें तर तें जाति किंवा क्तिया होईल अशी व्यभिचाराची, मुळींच भीति नाहीं. तेव्हां गुणवचनस्य ह्या पदाचा, द्विर्भावांतील मूळ ( प्रकृति ) शब्दाशीं संबंध जोडावा व “ गुणवाचक म्हणूण जो शब्द ( प्रसिद्ध ) असेल त्याचाच, सादृश्य हा अर्थ दाखवावयाचा असतांना ( प्रकारे ) द्विर्भाव करावा , ” असा सूत्राचा अर्थ करावा. [ कैय्यटाच्या वरील विवरणांत ‘ सादृश्ये द्योत्ये ’ असे शब्द आले आहेत. ‘ सादृश्ये वाच्ये ’ असे शब्द आले नाहींत. यावरून ( जगन्नाथाचा ) निष्कर्ष असा कीं, कैय्यटाच्या मतें, द्विर्भाव हा सादृश्याचा द्योतक आहे, वाचक नाहीं. अर्थात्‍ वरील द्विर्भावाच्या उदाहरणांत, वाचक लोप सरळच झाला. तेव्हां अप्पय दीक्षितांनीं केवळ धर्मलोपाचें म्हणून हें
उदाहरण न देतां, वाचकधर्ममल्लप्तेचें म्हणून हें उदाहरण द्यायला पाहिजे होतें. ] ह्याच प्रसंगानें, चित्रमीमांसकारांनी ( म्ह० अप्पय दीक्षितांनी ) आणखी असेंही म्हटलें आहे कीं,
“ ज्याची भक्ति करणार्‍या माणसांचा संसारही मोक्षसदृश होतो, त्या शंकराला न भजणारा माणूस जगांत पेंढयाच्या माणसासारखाच आहे.’ ह्या श्लोकांत, ‘ अपवर्गति ’ ह्यांतील क्किप्‍ प्रत्ययाचा व चञ्चा ह्यांतील कन् चा लोप झाला असल्यानें, दोन्हीही रूपांत, ( म्हणजे अपवर्गति व चञ्चा ह्या रूपांत वाचकधर्मलुप्ता उपमा आहे. ”

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP