आतां, ‘ अरविंदमिव भाति, ह्या वाक्याचा शाब्दबोध असा-ह्या ठिकाणीं अरविंद व इवार्थ सादृश्य ह्यांचा निरूपितत्वसंबंधानें प्रथम अन्वय होऊन, अरविंदानें दाखविलेलें सादृश्य, असा व नंतर त्या सादृश्याचा प्रकारता म्हणजे विशेषणता संबंधानें, धात्वर्थ जो भान त्याच्याशीं अन्वय झाला; आणि मग, “ अरविंदनिरूपित सादृश्य ज्यांत विशेषण आहे, असें जें भान ( म्ह० ज्ञान ) त्याच्याशीं विशेष्य म्हणून राहणारें मुख , ” असा शाब्दबोध झाला.
वरील वाक्यांत, ‘ सौंदर्येण अरविंदमिव मुखं भाति’ असें साधारण धर्म दाखविणारें ‘ सौंदर्येण ’ हें पद घातलें असतां, सौंदर्येण ह्या पदांतील तृतीया विभक्तीचा अर्थ प्रयोज्यत्व म्हणजे ‘ उत्पन्न होणें ’ . असा होतो. आतां ह्या तृतीयार्थ प्रयोज्यत्वाचा, धात्वर्थ भानाशीं ( म्ह० ज्ञान या अर्थाशीं ) अथवा इवार्थ सादृश्याशीं अभेदान्वय होतो; आणि मग “ सौंदर्यामुळें उत्पन्न झालेलें जें अरविंदनिरूपत सादृश्य, तें ज्यांत विशेषण आहे, असें जें भान, त्याचें विशेष्य मुख ” , असा ह्या सबंध वाक्यार्थाचा शाब्दबोध होतो. ह्याचप्रमाणें गज इव गच्छति ( इत्तीसारखा चालतो. ) व पिक इव रौति ( कोकिळासारखा आवाज करतो. ) इत्यादि वाक्यांत, गज व पिक ह्या उपमानदर्शक पदांची गजकर्तृकगमनक्तिया व पिककर्तृक रवणक्तिया ह्या अर्थावर लक्षणा केल्यानें, “ गज वगैरेंच्या गमन वगैरे क्तियांशीं सदृश ज्या दुसर्या गमनादि क्तिया त्या क्तियांना अनुकूल अशी कृति करणारा ( कर्ता ) ” असा शाब्दबोध होतो.
ह्या ठिकाणीं एक शंका-
‘ घटो न पश्यति ’ ह्या वाक्यांत ‘ घटो न ’ ह्याचा अर्थ, घटाभाव म्हणजे घटाचा अभाव असा होतो, व तो पश्यति ह्या क्तियापदाशीं कर्म होऊन संबंध ठेवतो, असें जर म्हटलें तर, त्या वाक्याचा अर्थ ‘ घटाच्या अभावाला तो पाहतो , ’ असा होऊ लागेल. म्हणून ‘ न ’ ह्या पदाचा अर्थ जो अभाव त्याचा, क्तियापदाशीं कर्म म्हणून अन्वय होतां कामा नये; म्हणून त्याचें निवारण करण्याकरतां, ( अशी अट घातली जाते कीं, ) धातूच्या अर्थाला विशेष्य मानून त्या विशेष्यतेमुळें उत्पन्न होणारी जी प्रकारता म्हणजे विशेषणता, तिच्या संबंधानें ज्या वेळीं शाब्दबोध करायचा असेल त्या वेळीं, विभक्तीच्या अर्थाची उपस्थिति ही, ‘ प्रकृती ’ च्या दृष्टीनें स्वत: विशेष्य होऊन, त्या अन्वयाला ( म्ह० क्रियेशीं होणार्या अन्वयाला ) कारण मानली जावी. ह्या नियमाप्रमाणें पाहतां, ‘ गज इव गच्छति, पिक इव रौति ’ इत्यादि वाक्यांमध्यें इवादिक निपातांचा अर्थ जो सादृश्य त्याचा, धातूच्या अर्थाच्या ठिकाणीं अन्वय संभवत नाहीं. ( कारण कीं, इव ह्या निपातापुढें विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाहीं. ) आणि म्हणून, वरीलसारख्या वाक्यांत गजापासून निघालेलें जें सादृश्य त्याचा गमनक्तियेच्या कर्त्याशींच म्ह० आख्याताचा अर्थ जो कर्ता त्याच्याशीं अन्वय करणें भाग पडतें. आणि ह्या अन्वयांत, गजाच्या गमनक्तियेशीं सदृश असलेल्या गमनक्रियेचें कर्तृत्व ह्याला समान धर्म मानून, त्याचा गमनक्रियेच्या कर्त्याशीं अन्वय करणें भाग आहे. आणि अशा तर्हेचा, ( इवादिक निपातांचा, क्तियेच्या कर्त्याशीं अन्वय करावा, असा, ) आख्यातवाद ह्या ग्रंथाचें व्याख्यान करणार्या वासुदेव-शिरोमणींनीं सिद्धांत म्हणून सांगितला आहे.