उपमालंकार - लक्षण ३८
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या श्लोकांतील पदांत थोडासा फेरफार केल्यास व ब्नह्मांडमंडलाला उपमेय केल्यास, त्यांतही वरीलप्रमाणेंच उपमादोष आढळेल.
“ थोर महात्म्यांचें द्राक्षाप्रमाणें मधुर वाक्य, कौमुदीप्रमाणें चरित्र व अमृताप्रमाणें नेहमीं आर्द्र अंत:करणें असतात. ” ( लिंग व संख्या अननुरूप असल्याचा हा दोष )
“ ज्यांनीं आपल्या स्त्रीला शरीराच्या डाव्या बाजूला बसविले आहे असा ( भालप्रदेशावर तिसरा डोळा असणारा ) शंकर, विजेनें आलिंगिलेल्या शरद्ऋतूंतील मेघाप्रमाणें भासतो. ” ( हा धर्मन्यूनतेचा दोष )
ह्या श्लोकांत कपाळावर असलेला डोळा हा बिंबरूप. त्याला प्रतिबिंब म्हणून मेघांमध्यें कोणताही धर्म सांगितला नसल्यानें, ह्या ठिकाणीं न्यूनत्वरूप उपमादोष आहे. पण ह्याच श्लोकांत भाललोचन ह्याऐवजीं ‘ भगवान् भव: ’ अशीं पदें घातल्यास, बिंबरूप धर्माचा अभाव होईल आणि मग प्रतिबिंबरूप धर्माची अपेक्षाच राहणार नाहीं; आणि म्हणूनच ह्या श्लोकांत उपमादोष होणार नाहीं.
“ भगवान विष्णूच्या वक्ष;स्थलावर रूळत असलेलें कौस्तुभ रत्न, अनेक तारकायुक्त गगनांगणांत दिसणार्या मंगळाप्रमाणें अत्यंत शोभतें. ” ( हा धर्माच्या आधिक्याचा दोष. )
ह्या श्लोकांत, अनेक तारका ह्या प्रतिबिंबभूत धर्माच्या जोडीला बिंबरूप धर्म पहिल्या ओळींत नसल्यानें, येथें आधिक्य नांवाचा दोष आह. पण ह्याच श्लोकांत, ‘ विष्णोर्वक्षसि मुक्तालिभासुरे भाति कौस्तुभ: ’ ( मोत्यांच्या सरांनीं चकाकणार्या श्रीविष्णूच्या छातीवर कौस्तुभ शोभतें. )
असा फरक केल्यास, उपमादोष होणार नाहीं. कारण मग ह्या श्लोकांत असलेलीं, वक्षस्थल व गगनांगण हीं जीं विशेषणें, त्या दोन विशेषणांचीं विशेषणें, मुक्तालि व तारकागण हीं दोन्हीं ( अनुक्तमें ) बिंबप्रतिबिंबभाव-संबंधानें इजर असल्यानें, त्यांच्या जोरावर वक्षस्थल व गगनांगण ह्यांचा बिंबप्रतिबिंबभाव जुळतो व त्यावरच ही उपमा अवलंबून असल्यानें, ह्या उपमेंत दोष राहत नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP