उपमालंकार - लक्षण ३०
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या श्लोकांत मूढ वगैरे शब्द नसल्यानें, असूया वगैरे भावांची प्रतीति होत नाहीं. त्यामुळें येथें प्रधानत्वानें उपमाच व्यंग्य आहे ?
आतां ह्यापुढें, “ साधारण धर्माहून सादृश्य हा एक निराळा पदार्थ आहे. ” ह्या मताला अनुसरून उपमावाक्यांच्या शाब्दबोधाचा विचार करूं-
‘ अरविंदसुंदरं ’ ह्या पदांतील अरविंद पदाची, “ अरविंदानें निरूपति जें सादृश त्या सादृश्याचें प्रयोजक (= कारण ) ” इतक्या अर्थावर लक्षणा आहे.
ह्या लक्ष्यार्थाचा सुंदर ह्या पदाच्या अर्थाचा एकदेश ( म्हणजे एक भाग ) जें सौंदर्य ( कारण सुंदर म्ह० सौंदर्ययुक्त; अर्थात् सौंदर्य हा सुंदर या पदाचा एक देश. ) त्याच्याशीं अभेदसंबंधानें अन्वय होतो; व ह्या वाक्याचा शाब्दबोध असा:-“ अरविंद ह्या उपमानाच्या योगानें दाखविलेलें जें सादृश्य त्याला प्रयोजक ( म्हणजे कारण ) जें सौंदर्य त्यानें युक्त जो सुंदर हा पदार्थ, त्याच्याशीं अभिन्न. ( आणि शेवटीं, सुंदर हा पदार्थ म्ह० नामार्थ, मुख वगैरे पदार्थाशीं-अभिन्न ). ” निपात सोडून ( बाकीच्चा प्राति-पदिकांपैकीं ) दोन नामार्थांचा परस्पराशीं भेदानें अन्वय करणें हें, व्युत्पत्ति-शास्त्राच्या दृष्टीनें चुकीचें असल्यानें ( प्रयोजक व सौंदर्य ह्या दोन नामार्थांचा अभेदान्वय होऊन शेवटीं सौंदर्यवत् ह्या नामार्थाचा मुख वगैरेशीं अभेदान्वय व्हाया म्हणून ) अभेदसंबंधाचें ( आम्ही येथें ) अनुसरण केलें आहे. ( आतां सादृश्यप्रयोजक या, वरील शाब्दबोधांतील नामार्थाचा, सुंदर या पदार्थांतील सौंदर्य या एकदेशाशीं अन्वय तुम्ही, प्रस्तुत शाब्दबोधांत, केलाच कसा ? एकदेशान्वय तर व्युत्पत्तिशास्त्राला मान्य नाहीं. ” या शंकेला जगन्नाथ उत्तर देतो:- ) एकदेशान्वय हा, ( व्युत्पत्तिशास्त्राच्या दृष्टीनें गैर असला तरी ) ‘ देवदत्तस्य नप्ता ’ इत्यादि प्रयोगांत, ज्याप्रमाणें स्वीकारणें भाग पडतें, त्याप्रमाणें येथेंही स्वीकारावा.
अरविंदसुंदरम् । ’ ह्या संबध समासाचीच , ‘ अरविंदानें दाखविलेल्या सादृश्याच्या कारणाशीं अमिन्न असलेल्या सौंदर्यानें युक्त अस लेल्या पदार्थाशीं अभिन्न ’ इतका अर्थ दाखविण्याची शक्ति आहे असें कुणी म्हणतात, तर दुसरे कित्येक असें म्हणतात कीं, अरविमद हें पदच लक्षणेनें वरील सर्व अर्थ दाखवितें व सुंदर हें पद त्या अर्थाचें मात्र तात्पर्य ग्राहक आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP