उपमालंकार - लक्षण ३९

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“ ह्या महाराजांच्या ( अथवा कुबेराच्या ) हातांत असलेला राजहंस पक्षी, हस्त नक्षत्राशीं बिलागलेल्या पूर्ण चंद्राप्रमाणें शोभतो. ”
ह्या श्लोकांत ‘ रराज ’ ह्या क्रियापदानें, ‘ भूतकालांत असलेला ’ असा अर्थ दाखविला जातो. व त्याचा अन्वय जरी राजहंसाशीं होत असला तरी चंद्राशीं होत नाहीं; ( कारण कीं, चंद्र हा नेहमीं वर्तमान-कालांतच असतो. ) म्हणून ह्या ठिकाणीं न जुळणार्‍या कालानें युक्त असा साधारण धर्म असल्यानें, ‘ न जुळणारा काल ’ हा उपमादोष येथें आहे.
“ रावणाचा शत्रु जो भगवान रामचंद्र, त्याचें रणांगणावर चोहोंकडे विखुरलेले बाण, उन्हाळ्यांत भर दुपारीं आकाशांत तळपणार्‍या सूर्याच्या प्रखर किरणाप्रमाणें तळपत होतें. ” ( कालाच्या अननुरूपतेचा हा दोष )
अथवा ह्याच दोषाचें दुसरें उदाहरण--
‘ तुझे पति आले अशी लोकांची वाणी ऐकतांच, ताडकन्‍ उंबर्‍या-जवळ येऊन, ती मृगनयना, चंद्राच्या चांदण्याप्रमाणें, माझे डोळे केव्हां निववील बरें ? ”
ह्य श्लोकांतील शृण्वती ह्या वर्तमानकालवाचक धातुसाधितानें, ‘ लोकांचे शब्द ऐकल्याबरोबर, माझी प्रिया घराच्या उंबर्‍याजवळ येईल ’ असा अर्थ सांगितला आहे; आणि म्हणूनच, ऐकणें व उंबर्‍याजवळ येणें ह्या दोन क्रिया एकाच वेळीं झाल्यानें, ह्या ठिकाणीं, अतिशयोक्ति अलंकार झाला आहे; व त्यानें, नायिकेच्या अत्यंत त्वरेचें सूचन केलें आहे; व त्यामुळें, नायिकेच्या मनांतील नितांत औत्सुक्याचा परिपोष झाला आहे.
चंद्राचा चांदण्याची श्लोकांत दिलेली उपमा, श्लोकांत प्रधान असलेलें नायका़च्या मनांतील औत्सुक्य परिपुष्ट करतें. चकित हें श्लोकांतील विशेषण, आगमनाचें ( विशेषण ) दिसत असलें तरी, खरोखर विचार केला असतां, पाहणें ह्या क्तियापदाचें विशेषणच मानलें पाहिजे; आणि तसें मानल्यास तें, पाहणें ह्या क्तियेला अनुकूलच होईल. अशी वस्तुस्थिति असल्यानें, भविष्यकाळीं डोळे निववील हा धर्म ज्याप्रमाणें उपमेयाशीं अन्वित झाला आहे, त्याप्रमाणें, तो उपमानाशीं अन्वित होत नाहीं. ( आणि म्हणूनच ‘ न जुळणारा काळ ’ हा उपमादोष येथें आहे. )
“ हे पृथ्वीचें भूषण असणार्‍या राजा, ह्या एवढया मोठया राजे लोकांच्या मंडळांत, तूं तारकामंडलांच्या मध्यें जसा चंद्र तसा शोभतोस. ”
या श्लोकांत ‘ राजसे ’ ह्या क्तियापदाचा, संबोध्य व उपमेय जो राजा त्याच्याशीं जसा अन्वय जुळतो, तसा चंद्राशीं जुळत नाहीं. ( म्हणून हा उपमादोष-कालाच्या अननुरूपतेचा. )

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP