मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
आद्यखंडानुक्रमणी

आदिखंड - आद्यखंडानुक्रमणी

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥श्री॥
तपोभि: क्षीणपापानां शांताना वीतरगिणां ।
मुमुक्षूणामपेक्षोय मात्मबोधोभिधीयते ॥१॥
तवं शिष्यु ह्मणें श्रीगुरु । तुं भवसगरिचें तारु । मज उतरि पारु । या अगाधाचां ॥१॥
हा व्यामोहोचा सागरु । कैसा दाटला दुस्तरु । नाना साधनीं उतारु । न दिसे याचा ॥२॥
येथ वासनेची खोलिवां । अहंताशिळेचा थडिवा । प्रपंचगिरिचा मेळावा । याचि मध्यें ॥३॥
दाटला अज्ञानवाळुवे । भेदतरंगाचे यावें । काळबुध्दुद नावें । उठति निमती ॥४॥
महा मोहो डोहीं । डहुळताय तापत्रयीं । आशादि सुसरी उपाई । झोंबताति ॥५॥
कामक्रोधादिक वळसे । हेळावे येताति आपैसे । विषये मीन आमिषें । घेउं धावति ॥६॥
उपाधि उसासे देत । भ्रांति भ्रमे चळित । जन्ममरणें तळांत जात । येत जीव ॥७॥
यांचिमध्यें विशाळु । वैराग्य तप्तवडवानळु । संशयशब्दें धुमाळु । गर्जना करी ॥८॥
पाहातां यांचा चि उदरीं । बोधपन्नकीं आत्माहरी । याचां पदपंकजी सुंदरीं । शांतिश्रिया ॥९॥
हा गुणत्रयें दाटला । मनादिकीं विवर्त्तला । ह्मणौन यामाजि लोपला । आत्मा विष्णु ॥१०॥
माया अविद्या दरडी । कैसेंनि उतरावी थडी । इंद्रियें देऊनि बुडी । तळालां नेती ॥११॥
जैं ब्रह्म अगस्ति प्रगटे । तैं हा समूळ आटे । मग येथिचीं विघ्रें कोठें । राहों ह्मणतीं ॥१२॥
हें देह अष्टपुर । नवां व्दारांचे खोकर । हें चि तारुं करुनि तीर । उतरावें याचें ॥१३॥
तरि जी देवा श्रीगुरुनाथा । जेणें हरे संशयव्यथा । ते अनुक्रमणीकथा । विस्तारा असी ॥१४॥
हा ग्रंथ सर्व शुध्दु । नाम ठेविलें बाळबोधु । हा चि अर्थु प्रसिध्दु । प्रकट करा जी ॥१५॥
हा जी बाळ तें कवण । त्याचें कैसें लक्षण । अज्ञानेंसहित अन्यथा ज्ञान । सांगावें त्याचें ॥१६॥
बोधु तो काय कैसा । तेथ कैसी ब्रह्मदशा । ज्ञान विज्ञान प्रकाशा । तेथीचें आह्मां ॥१७॥
मुख्य ब्रह्म कवण । सगुण किंवा निर्गुण । सर्वस्थ सर्वासमान । किं येकदेशी तें ॥१८॥
जी जी प्रपंच जीवभूतां । ब्रह्मीं भेदु किं अक्यता । समष्टिव्यष्टीची वार्त्ता । निवडोनि द्या जी ॥१९॥
हा संसारु कवण । ईश्वरी अक्य किंवा भिन्न । प्रकृतिपुरुषाचें लक्षण । वोजा किजे ॥२०॥
ब्रह्म निर्विकार निर्गुण । कैसें जालें तें सगुण । माया येकदेशी किं संपूर्ण । ते निवडली कैसी ॥२१॥
जरी कैसें पुरुष कोण पदें । तें बोलावीं प्रसिधे । भूतें नव्हतीं एवंविधें । तैं ईश्वरतनु कासयाचि ॥२२॥
बह्मिष्ट बोधें कैसें प्रौढ । आणि हें मायेचें गुढ । हें कळें असें दृढ । करा मज ॥२३॥
महत्तत्व काय कवण । कैसें प्रणवविवरण । बीजें मातृका देवगुण । बोला तेथिचें ॥२४॥
कवणें अहंकारीं कवणें । तत्वें जालीं उत्पन्नें । देहीं दंश वायुचीं सांगा स्थानें । यांचीं कारणें कोठें ॥२५॥
ब्रह्मा विष्णु रुद्र ईश्वरु । सदाशिव आदि सर्वेश्वरु । यां षट्‍ तत्वांचा करुनि निर्धारु । सप्तम स्कंदु बोला ॥२६॥
हिरण्यगर्भु जगदीश । देह इंद्रियें प्रकाशु । परस्परानुप्रवेशु । कैसा जाला ॥२७॥
कैसें तत्वाचे व्यापार । वाचा देहविकार ।या विराट देवाचें शरीर । निरुपा जी मज ॥२८॥
पुराष्टक गुण भेद । सांगा ईश्वरतनु शबळ शुध्द । खेचर उत्पन्न प्रसिध्द । बोलावें तें ॥२९॥
भूतें होईजे देहांतीं । किं हे भूतसृष्टि आईति । यांचि आहार व्यवहार स्थिति । कैसी असे ॥३०॥
ग्रह पितर देव ।यांचे कर्मधर्म भाव । हें मनुष्याचें होते सर्व । चालती कैसे ॥३१॥
कर्माकर्म कर्मश्रेष्ट । निरुपावें कर्मभ्रष्ट । सांगा योग वरिष्ट । तेथें प्रमाण काई ॥३२॥
नाना हे जीव अपार । यामधें कोणतें सार । याचें ज्ञान निरंतर । कोणा असे ॥३३॥
याचें चळन नसे सारिखें । अवस्था ही सम नेदखे । याची गति स्वमुखें । सांगा स्वामी ॥३४॥
चतुरासी लक्ष योनी । मध्यें सार कोण खानी । या भूतग्रामाची मांडणी । कैसी असे ॥३५॥
कवणें योगें जागृती । कवणे प्रवर्ते स्वप्रस्थिति । कवणें प्रकारें सुषुप्ति । तुरीइया ते कैसी ॥३६॥
देवां नरी जीवां समस्तां । याच्या सांगाव्या अवस्था । कोण भूतयोनि हे वेवस्था । कळों दिजे ॥३७॥
माये अविद्येचेनि संबंधें । देव भूतें प्रसिध्दे । कां जालीं बहुविधें । हें गुह्य उघडावें ॥३८॥
च्यारि लयस्थानें चारि प्रलय । ज्ञानप्रळय कैसा होय । असी सिध्दरचनेची सोय । आह्मीं नेणों ॥३९॥
ब्रह्में प्रपंच वेधें । किं प्रपंचे ब्रह्म बाधे । सांगावें दृष्टांत शुध्दे । प्रमाणें सहित ॥४०॥
मुख्य ब्रह्मा तो कवणु । त्याची उत्पत्ति कोठूनु । याचें स्वरुपलक्षण । कैसें असे ॥४१॥
याचें आयुष्य केतुलें । मांगां किति भोगिलें ।पुढां दिवस उरलें । तें ही सांगा ॥४२॥
या ब्रह्मांडा नाशु कैसा घडे । हें कवणें परि कोठें मोडे । हें कोण स्थळीं एवढें । पावैल लया ॥४३॥
एवं पूर्वखंड मांडणी । शतदीढ अनुक्रमणी । पंधरा कथनें सुवाणी । सिध्दि नेणें ॥४४॥
॥इति आद्यखंडानुक्रमणी ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP