मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| मध्यखंडानुक्रमणि आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - मध्यखंडानुक्रमणि सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी मध्यखंडानुक्रमणि Translation - भाषांतर आतां मध्यखंड कारण । आधिं मंगळाचरण । पाठिं करावें लक्षण । गुरुशिष्याचें ॥४५॥सगुणदेवा पासाव । कैसें उठिलें हें सर्व । रुद्र भूतें मानव । कैसें जालें ॥४६॥पूर्वी ईश्वरापासूनि । जीव निवडलें कैसेनि । मायादि देहीं कवणें गुणी । उल्लंघोनि येती ॥४७॥महाकारणादिकें च्यारी । कैसी मिनलीये शरींरी । कोणें गुणसंगें कोण धरी । देह जीव ॥४८॥कर्मापासाव जीव । कैसें जालें सावयव । गर्भसंभूतिभाव । निरुपावे ॥४९॥हा जी मातेचे उदरी । गर्भ वाढे कोणेंपरी । वेष्टला वरे माझारी । तैं कोणें व्दारी भक्ष त्याचें ॥५०॥तो कोणें लक्षि तेथें वांचला । जैं उदराबाहिर निघाला । तैं गर्भभाव विसरला । कोणें गुणें ॥५१॥याच्या उमी वींकार कैसें । हें जालें कोणाचें अंशे । यामध्ये काय काय असे । तेहिं सांगा ॥५२॥देहीं जीवाचें भ्रमण । करावें अजपानिरुपण । प्राण आयुष्य प्रमाण । चाले कैसें ॥५३॥श्वासोश्वासा मूळ काय । हा जपू कोठुनि होय । हंस हंस याचि सोय । सांगा स्वामी ॥५४॥स्थानें चक्रें देवतें । बीजें मातृका सहीतें । दिवस प्रमाण निरुतें । निरुपावें ॥५५॥कवणें मार्गे चाले हंसु । चक्रीं कैसा दिवसु । भुवना खंडाचा विश्वासु । कीजे देवा ॥५६॥येर देहचि थानमान । बोलावें सर्वही लक्षण । शशिरवीचें भुवन । कैसें असे ॥५७॥मुक्त जाणावें कैसेनि । कोणते निराभिमानि । कोणें बुध्दी स्वस्थानीं । चित्त बैसें ॥५८॥योनि कंदि नाडी कीति । कैसी देही ल्याचि गती । कमळनाळाचि उत्पत्ति । सांगा मज ॥५९॥कळायुक्त सकळ । निरुपावें अष्टदळ । जीवात्मयाचें खेळ । कैसें तेथें ॥६०॥देही प्राणु जीवहंसु । यां तिहींचा करा विश्वासु । आणि इहस्थानि कोण आत्मपुरुषु । अपरु तो कोण ॥६१॥कोण संधि कोण अंतरात्मा । कोण परस्थानी कोण परमात्मा । हें देहव्दयीं आणौनि नेमा । पूर्ण हि दावा ॥६२॥बाहातरि कोष्ठे नवनाडी । सोळा संधीच्या उतरडी । हे पुरुषोध्दारण परवडी । सांघावें मज ॥६३॥जो आत्मनाद ईश्वरीं । तो कळे कवणेंपरीं । तोचि मुख्य ऊँ कारीं । जाणवे कैसा ॥६४॥कैसा गर्जत असे ब्रह्मांडी । कैसा तो वोळखिजे पिंडीं । जेणें देहाच्या घडमोडी । तो दावा मज ॥६५॥चतुर्विध योगलक्षणें । ते हीं कथा विकासणें । दशदेहें निरुपणें । रसभावेंसी ॥६६॥आसन तें कैसें दीजे । कैसें प्राणनिरुंधन कीजे । कें प्रत्याहारु जाणिजे । कोणतें धारण ॥६७॥ध्यान कैसें कोण समाधि । चक्रें भेदावीं कोणें बुध्दि । बंधत्रयसिध्दि । पावती कैसें ॥६८॥विद्येअविद्येरुप कैसें । बिंब प्रतिबिंब सांगा तैसें । ब्रह्मीं आणि प्रपंची बुध्दि कां असे । अभेद तरि ॥६९॥मुख्य देह आत्मकाज । याचें कोठें काय बीज । हें अनित्य सहज । निरसे केवि ॥७०॥येका आत्मदेवावाचुन । येरां पासाव काढा मन । उपाधि निरसुनि निरुपण । सहज तें करा ॥७१॥पुराणें दर्शनें उपाधी । भेदु सारा आत्मबुध्दि । ब्रह्मीं प्रपंचाची सिध्दि । कोणें बीजें ॥७२॥जें गुह्य योगियां । तो आदिनाथ कोण श्रीगुरुराया । याचिपरी आदिमाया । दावा मज ॥७३॥कर्त्ता पुरुष तो कवण । कोणतें कारणें भिन्न । तिसून्यापासुन । अक्षर काय ॥७४॥कैसें सून्याकार सर्वत्र । सांगा भक्ति मुक्ति पवित्र । सहित क्षेत्रज्ञ देहक्षेत्र । निरुपावे ॥७५॥शिव जीव ब्रह्मवरी । यांचें विकार कोणें परि । जीवु कोण ते निर्धारी । उकलूनि देणें ॥७६॥जीवात्मा कोण जीव । याचा परमात्मा सांगावा । तैसाचि निर्धारु शिवा । करुनि देणें ॥७७॥द्या जी ज्ञान रोकडें । मुख्य शब्दु कैसा घडे । देहव्दयीं कोणे पाडें । विस्तारला तो ॥७८॥पाठीं ईश्वराचि महिमा । निरुपावी पुरुषोत्तमा । त्या ईश्वरा जीवात्मा । कोण असे ॥७९॥सकळां परमात्मा ईश्वरु । असा जाला निर्धारु । त्यासी परमात्मा आहें की ना हा विचारु । कैसा असे ॥८०॥पिंडब्रह्मांडाच्या अवस्था । देहां चौची वेवस्था । जेथ वस्ति समस्ता । तें भुवनें कोणें ॥८१॥हे चतुर्विध जीवसृष्टी । तुह्मी दावा माझे दृष्टी । मंद बुधांचे संकष्टी । न घला मातें ॥८२॥हें शरीर कोठें आटे । याचा नाशु कैसा घटे । येथीचा मेळु फुटे । तो कोणा मिळे ॥८३॥एवं शतदीढ कारण । बोला अनुक्रमें वचन । पंधरा कथनें निरुपण । मध्य खंडिचें ॥८४॥इति मध्यखंडानुक्रमणि ॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP