आदिखंड - प्रलय
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
येक असें ह्मणती । या महद्भूतांचि समर्थ स्थीति । ते नाशातें न पवती । कोण्हे ही काळीं ॥१२॥
ये पृथ्वी एवढें ढीशाळ । कोठें आटैल समूळ । हे एवढें महाजळ । निभे कोठे ॥१३॥
हें असंख्य तेज कोठें सरे । हा दाटला वायु कोठें विरे । हे पोकळी कासेन भरे । आकाशाची ॥१४॥
यें आहाति तैसींचि आहाति । नाहीं नाशु ना उत्पत्ति । परी ये वचनें सिध्दांति ।अप्रमाणें ॥१५॥
स्छिति संहारु । जो बोलवला तो साचारु । हरिहरादिकांच आधारु । आहे यां वचना ॥१६॥
आणिक एक ऐसें ह्मणती । या ब्रह्मांडा परती । ऐसें ब्रह्मांडें नेणों किती । आणिकें असति ॥१७॥
जैसें ये ब्रह्मांडीं आपले पिंड ।तैसें तें ब्रह्मांडी हे ब्रह्मांड । येकाहोनि एका उदंड । आयुष्य असें ॥१८॥
येणें ब्रह्मांडेंसी ब्रह्म सरे । तें महब्दह्मांडेंसी विष्णु उरें । या चि परि सामोरे । प्रमाण हराचें ॥१९॥
असें आईकीजे बोलणे । तें अदृष्ट देखिलें कोणें । बोलिलें असे पंचाननें । तें चि प्रमाण ॥१२०॥
असो हे भूतें ग्रासुनि अहंकारु । मायेचां ठाईं होय धीरु । हेतु सांडी ईश्वरु । तै हें हि नुरे ॥२१॥
परि ब्रह्म अविकृत । असें जाणावें निभ्रांत । शब्द अनुमान दृष्टांत । न पवति तेथें ॥२२॥
॥ इति प्रलय ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP