मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
प्राण व्यापार

आदिखंड - प्राण व्यापार

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


स्वामि सत्ता वर्त्तावे । आपुलें प्रोहितपण रक्षावें । पाइकांते चाळावें । तेवि करणें विषयांचें ॥४८॥
धरावी विषयाची चिळसी । कां फांकुं नेदावीं अन्यरसी । तैं दमन इंद्रियांसीं । लागेचि ना ॥४९॥
या इंद्रियां का दमावें । बापुडें मन कां मारावें । समूळ विषया वळावें । हें चि पुरें ॥५०।
आधारुं कां बाउलियासी । कळा चाळी दोघांसी । तेवि व्यापारु विषयांसी । देह धर्माचे ॥५१॥
गळित दोहि चिं इंद्रियें । न चळती सांडिली विषयें । सूत्रें तुटे तैं कार्यें । कोण उरे ॥५२॥
या विषयाचें आधारें । देहिं सुख दु:ख संचरे । ते भोगावें निर्धारें । अंत:करणादिकीं ॥५३॥
प्राण वहन व्यापारें ।तत्वें निश्चलें निर्धारें । विषयांचे सूत्रें बारें । चळती इंद्रियें ॥५४॥
जे ठाईं निश्चळपणें । थिरें असोनि बहुत घेणें । ते ज्ञान पंचक वोळखणें । श्रोत्रादिकें ॥५५॥
जे चळती व्यापारें । आणि घेणें तरि अपुरें । तें कर्मेंद्रियें परिकरें । वाचादिकें ॥५६॥
देह इंद्रियं सकळां । प्राण पंचक मुख्य कळा । याचा ब्यापारु वेगळा । करुनि सांगो ॥५७॥
व्यानें सर्वागीं वसावें । उष्ण शीतातें जाणावें । रोम रोमीचे घ्यावे । सुख दु:ख ॥५८॥
नाडी शीरा चाळती । अंगें गात्रें लवती । त्या समानाची वस्ती । नाभी देशीं ॥५९॥
शब्दाचा उचारु करी । रसना स्वादातें धरी । तो कंठा माझारी । उदानु नसे ॥६०॥
जें देहिचें सांडणें । तें कर्म करावें अपानें । गुदीं मांडोनि । वसे तो ॥६१॥
जो वर्ते श्वासोश्वासें । जो करी क्षुधे तृषें । तो प्राणु व्से । हृदयास्थानीं ॥६२॥
नागु पाचेंसीं वर्त्ततु । कूर्मु चक्षोन्मिळितु । कृकुल सीकेतें देतु । देवदत्त जंभने ॥६३॥
धनंजय ब्रह्म व्दारीं । अनुहातातें करी । असें पांचाच्या व्यापारी । नागादिक ॥६४॥
हे प्राणाचे व्यापार । प्राणे चळे शरीर । प्राणेंविण साकार । उरे कैचें ॥६५॥
॥इति प्राण व्यापार ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP