मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
ब्रह्मीष्ट लक्षण

आदिखंड - ब्रह्मीष्ट लक्षण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


ज्ञत्व कतंत्व भोक्तृत्व -साक्षित्वादिविभावनात्‍ ।
शक्तयो विविधं रुप धारयंतो बहूदकं ॥१॥
ईश्वर शुध्द निर्मळ । तो जगदादि जगन्मूळ । अनादि अंतु केवळ । हा चि होय ॥१॥
येथें चि वेदां मुरकंडी । वळली वाचांसी बोबडी । दर्शनें जालीं वेडी । ये चि ठाईं ॥२॥
समुद्रु शिवे शिवे । तो गंगा चि जाय जीवें । त्या महार्णवा सांठवावें । हें तो न घडे ॥३॥
निशा समूळ वोसावें । तों चि प्रभा दाविती दीवे । ते ही सूर्या प्रकाशावें । हे तों अघट सर्व ॥४॥
तेवी ईश्वरीं क्रिया बुडे । साधन दाविजे पुढें । तयां केवी आंतुडे । ब्रह्मसुख ॥५॥
परि अनुभवाची खुण । ब्रह्म जाणे तें ब्रह्म ज्ञान । तेथ ठकमक वाचून । काय असे ॥६॥
तें महासुखनिधान । परबुधां माजवन । ते यासी मर्यादा कवण । करील बा रे ॥७॥
जो कष्टे जीवपणें । त्याचें आंगीं पूर्ण बाणें । आणि हें विश्व ही तेणें । ते चि देखिजे ॥८॥
ब्रह्म प्रपंचातें आधिष्ठी । किं प्रपंच ब्रह्मांचां पोटीं । ना ना ब्रह्म प्रपंचा घसवटी । एकपणाची ॥९॥
ब्रह्मीं प्रपंचु हे नेमु । तथा चि प्रपंचामध्ये बह्म । हे कां मी आणुं वर्म । ज्ञाते जाणती ॥१०॥
परि यासी हि बुधजन । मज देखति दूषण । नाहीं ब्रह्मीं प्रपंच भिन्न । तरि कोणातें काय ॥११॥
या भेदमताचे दृष्टांत । हो ऐक्यतारहित । रे हें ब्रह्म सदोदित । प्रपंचु गोठला ॥१२॥
जळीं तरंग निरंतर । कदा हि न पडति बाहिर । कीं वन्हिवेगळें साचार । दीप नव्हति ॥१३॥
वायूचें धांवणें वेगाडे । तर्‍हि तें नभनभीच तेव्हढें । किं सुतावेगला न पडे । कापडभारु ॥१४॥
निवडी विधाता हि आपण । तर्‍हि नव्हैल हेमाभिन्न भूषण । किं पोतासु परिमळु आन । शिवें हि न कीजे ॥१५॥
समर्थ गिरिजा येवढी । न गळवे अमृताची गोडी । किं नादीहूनि शब्दु आसुडी । हा देवो नसे ॥१६॥
तेवि उभारा नानामतांचा । भेदें फोडिति प्रपंचा । तर्‍हिं ते ब्रह्मविद्‍ ब्रह्मींचा । चढेले ना ढळे ॥१७॥
वेदासारिखा समर्थु । ब्रह्म प्रपंच दावी व्द्यर्थु । असा वाढविला मथितार्थु । भेदसूत्रें ॥१८।
तों तो अभेदु आइता असे । मग सुखावला पूर्ण दशे । ब्रह्म चि प्रपंचु असें । नेमिलें तेणें ॥१९॥
हें चि ब्रह्मिष्ठाचें लक्षण । ब्रह्म जाले आपण । ते ब्रह्म प्रपंच भिन्न । देखती चि ना ॥२०॥
कहीं तर्‍हि देवा स्वप्रीं । भेदु देखते कां ब्रह्मज्ञानी । कां भेदु नित्य ह्मणौनि । ऊँ थारते कां ॥२१॥
कां बालचेष्टनें पुरतें । भेदु आहे हे बोलते । तर्‍हि साच वाटतें। अस्मादिकां ॥२२॥
डोळां दाटितां बोटें । सर्व व्दिधा उमटें । असें तर्‍हि भेदवाटे । लाविते कां प्रबुधा ॥२३॥
तपना प्रीति येति थोर । आंगिं वमता हिमकर । कां थिलरीचें नीर । घेऊनि धाता ॥२४॥
हें सहस्रकरा अस्या सिध्दि । तमातें वाउनि स्वस्कंधी । सुखें रयनीमधी । नृत्य करितां ॥२५॥
तैं या दृश्याचें टवाळें । ब्रह्मीष्टा फळतें कोण्हें काळें । त्यांची वासना हि न विटाळें । भेदभावीं ॥२६॥
शशिसूर्याचिये भेटी । परस्परें तमाच्या गोष्टी । करी ते तै दृष्टी । दिसतें व्दैत ॥२७॥
स्वमार्ग सांडूनि भास्करा । जाणें होय दिगंतरा । तर्‍हि तेजर हितें अंधकारा । योग्य नोहे ॥२८॥
तैसा केव्हां कोण्हें पाडे । प्रबुध प्रपंचीं मुरडे । तो प्रापंचिक तेव्हढें । तें चि देखे ॥२९॥
आणि बृहदार्णिकीं वेदु । समूळ निरसिला भेदु । ‘ यव्दैतं न पश्यति ’ हा संवादु । पोषिला तेथ ॥३०॥
सिध्देशें नरसिंहें कमळाकरें । आह्मां दाखविलें निर्धारें । तें केव्हां तर्‍हि दूसरें । देखतो कां ॥३१॥
हरहर सिध्दनाथा ।येक हि न ठेविसीच माथा । तेथ व्दैताची कथा । काय आह्मां ॥३२॥
ब्रह्म जालयाहीं बोले असा । येवढा माझाचि धिवसा । समर्था आत्मनिष्ठा भाशा । उठैल कां हे ॥३३॥
जेंहि वोपिलें माझां हातीं । त्यासी काये हे नव्हति मति । परि उरि बोला पुरती । कैंची तेथें ॥३४॥
ज्ञाते ब्रह्मप्रतिपादक । ये भूतळीं बहुत लोक । ते कथा किडाळक । मिर्विती काय ॥३५॥
तया ब्रह्मानंदु थोरु । आनंदे आपुला हि विसरु । यास्तव हेतु अंकुरु । पळपोनि जाय ॥३६॥
ब्रह्मविद्‍ ब्रह्मसुखें । निवात राहे नोबले मुखें । अजा सर्गु देखे । तयापरि ॥३७॥
पुरुष कामिनीचे आर्त । निवालयां ठकाचें चित्त । किं परपदीं अकस्मात । दीन बैसे ॥३८॥
किं निधि आतुडे परवरीं । ते उगेयाचि विस्मो करी । किं तस्करु पडे भांडरीं । समर्थाचा ॥३९॥
जातिअंधा दृष्टो प्रकटे । देखनेयाचा पाटा फुटे । किं दु:खजर्जरां प्रेतां भेटे । अमृतरसु ॥४०॥
किं मुकें अमृतें घालें । सर्व अंगीं बांबळलें । प्रेमे डोलों लागलें ॥ सांगेल काई ॥४१॥
त्या अखंड ब्रह्मीं आठऊं । वरि हा चि निगे प्रस्तावो । तैं कैसा सांठवेल भावो । त्यांचा देहीं ॥४२॥
जैसें आधीं चि घुमे संचारे । वरि डाहाकु वाजे गजरें । तेवि अंगीं सुभरें । सुख त्यांचां ॥४३॥
ते देखती बोलती आइकती । हुंकारें तेणें चि उठति । ते ब्रह्मानंदें डुलती । ब्रह्म चि तर्‍हिं ॥४४॥
तेणें वदन विकाशें । आळु माळु ये हांसे । नेणों काई चि उल्लासे । उठती बोल ॥४५॥
ते शरीरि न संटे । शिरा त्वचा त्राहाटे । प्रेमभरितेनि दाटे । सर्वाग त्याचें ॥४६॥
कंठ भरे सद्रदित । उकसां बुकसीं फुंडत । तेणें होतसे सकंपित । हॄदयनाभि ॥४७॥
तें प्रेम चि केवळ । उठति स्वेदबिंदु सकळ । नेत्रीं नासिकीं जळ । धारा फूट ॥४८॥
पाठीचे मणी भरती । प्राणु पडे आवृत्ति । आसनेची उडती । अस्माई पणें ॥४९॥
त्वचा कंपित अनुरागीं । रोमांच उदैत आंगी । धन्य धन्य ते जगीं । प्रेभ भरित ॥५०॥
तयाचया विकारा । रुप नव्हे शिष्यवरा । जे पढियेते ईश्वरा । जीवें प्राणें ॥५१॥
ते जीवन ईश्वराचें । कीं ईश्वर जीवन त्याचें । हें मीं प्रेम अल्प वाचे । किती आणू ॥५२॥
ते जीउतें पाहाती । तीउते जीव उध्दरती । तीर्थे पवित्रें होति । जयाचेंनि ॥५३॥
ते ईहलोकीं तरि सुलभ । परि ज्ञान प्रकाशाचेंनभ । ते सृष्टिचे स्तंभ । पवित्रपणें ॥५४॥
तें चिदात्मपदिचें इंद्र । बोधप्रकाशाचें चंद्र । ते आनंदाचें समुद्र । हेलावती ॥५५॥
ते मोक्षोदया भास्कर । ते शांतिचे प्राणेश्वर । ते सायुज्यतेचे उदार । आदि दाते ॥५६॥
ज्यासी बोलतां बोलाचा सिणु । त्यासी कविकाव्या उपा ऊँ कवणु । त्याचा आनंदु राखुनु । बोलिजे आह्मीं ॥५७॥
जेवि लेकुरें खेळती । खुतां लक्ष ठेविति ।तेथ श्रमनिवृत्ति । होये तया ॥५८॥
बाळ स्वइच्छा रीगे । मातेचे वोसगां निगे । ते विश्रांति वावुगें । सिणले पण ॥५९॥
तेवि प्रपंच बोलतां । प्रेम न भरेल चित्ता । यास्तव पूर्णता । सांडो नये ॥६०॥
प्रपंचु तरि दाखवावा । परि आत्मतंतु न संडावा । आत्मेनचि चेतवावा । ठाई ठाईं ॥६१॥
एवं जे होय विश्रांति । पोषे श्रोतयांचि चित्तवृत्ति । यास्तव पुडत पुडती । हेंचि बोलणें ॥६२॥
इति ब्रह्मीष्ट लक्षण ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP