आदिखंड - माया गूढ विचारणा
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
आतां आइक तो ईश्वरु । जो जाला साकारु । उठला अहंकारु । रचनेस्तव ॥६३॥
तेथ मींपण चि स्फुरे । उठलें दुसरें । तें रुप साकारें । ते आदिमाया ॥६४॥
तो पुरुष तें सुंदरी । माहामाया ईश्वरी । जयेची उभारी । हे भूतग्राम ॥६५॥
नमन ते चंडिके । त्या व्यापिलें सकळैकें । तिचें रुप कौतुकें । सांगों आतां ॥६६॥
ते अहंकाराची खोळ । महादेवी शबळ । आधिष्ठोनि सकळ । त्या रुप केलें ॥६७॥
जैसा बिजा पासूनु । तरु दीसे गहनु । तेवि ब्रह्मी होनु । ते माया देवी ॥६८॥
ते पतिसंभोगेंविण । प्रसवली गहन । ते आतां सांगैन । मी रुप तीचें ॥६९॥
ते व्याली एकतानुले । ते चौपरी विभंडिलें । बारा भाग केले ।ते येक येकाचें ॥७०॥
तेथूनि हे चराचर । केलें त्या गोचर । आणि चोज थोर । त्या मांडियेलें ॥७१॥
ते विणरितु रजस्वला । व्याली चोविसां बाळा । त्यांतु सां ढीशाळा । रुप केलें ॥७२॥
चौघांचे पडीभरें । चौदा लाविलीं व्यापारे । व्याली ते न पुरे । खाति असे ॥७३॥
अष्टादशे खाये । खादली तेचि विये । सां उजु ते पाहे । पैं कृपा दृष्टी ॥७४॥
तेही खाउलागे । स्वयं सेजे निगे । आपुलीचि अंगे । खाति असे ॥७५॥
बहुतांचि चाड धरी । मागुतें वमन करी । ते माया ईश्वरी । आदिशक्ती ॥७६॥
आणिकां तिंचि माता । ते जाली पुत्रवंता । येकु वडील असतां । व्याली पांच ॥७७॥
येक येक कापिले । पांचां पांचाठाईं केलें । तैसेचि मेळविलें । ते पंचभागीं ॥७८॥
निष्ठुर थोर माउली । ते उभयांचि चिरली । विभागुनि केली । पंनास खांडे ॥७९॥
ते दोनि गोळे केले । दृष्टि रांघियलें । हें रुप दाविलें । त्या लोकत्रयीं ॥८०॥
एक व्यापारीं ठेविला । येरुं जगीं वांटिला । हा पवाडा केला । त्या जगन्माता ॥८१॥
परस्परें वाटिला । तो महा स्थूळ जाला । त्रैलोक्या एतुला । पुरोनिं उरे ॥८२॥
तेंचि तें प्रत्याकारें । फोडोनि विस्तारें । चहुं भागांतरे । वाटियली ॥८३॥
नाना याति योनि खांडें । असंख्ये उदंडें । ते भिन्नें भिन्नें कोडें । विस्तारिलीं ॥८४॥
एवं नामें रुपें नाना । त्या नाहीं गणना । ते गीळी उगळी मना । पासूनियां ॥८५॥
ते उगळितां ये तोंडी । किं योनी मागें सांडी । जाणें भोगेविण गोडी । ते पुरुषाची ॥८६॥
असें ही असुनि वरी । त्या दाविली उभारी । बाळें खेळवी यापरी । पंचविसें ॥८७॥
पांच गर्भ उदरी । ते पडाताति बाहिरी । उदरा कोण्हेपरी । सांडिती नां ॥८८॥
आनें पांच सारें । तें पोटींची निर्धारें । त्याचे व्यापार बाहिरे । असंख्यात ॥८९॥
ते येक रुपें च्यारी । तर्ही पांचची निर्धारी । सुख दु:ख व्यापारी । त्यासी भोगु ॥९०॥
तें आणिक पांच पाहे । पोटिं ना बाहिर पोटिं आहे । पोटांतुळ गुह्यें । दाविताती ॥९१॥
ते पोटिचे बाह्ये नेति । बाहिचें पोटिं देति । पोटा बाहिर खेळविती । कळा त्यांची ॥९२॥
आणिक दाहा बाहिरें । तें लाविलें व्यापारे । त्या कदा भीतरें । एउं नेदीं ॥९३॥
ये दाहा बाहिची । ते दाहा पोटींची । पांच कळा याची । खेळवाया ॥९४॥
भरण पोषणादिक । नाहि करितां आराणूक । ऐसें केलें कौतुक । लोकत्रयीं ॥९५॥
जेवि येते व्दिभाग । षड्भाविक चांग । नारि नरु अंग । दावितसे ॥९६॥
घरांतु घरकुळे । खेळनें मंडिलें । हें आंगीं त्या दाविलें । आपुलेंचि ॥९७॥
त्यामाजी आपण । खेळतसे संपन्न । ऐसी सलक्षण । ते आदिमाय ॥९८॥
दोनि दाउं गेलि । ते असी फुटली । आपणचि जाली । खंडभागा ॥९९॥
तिची हेचि थोरी । पति सांठविला उदरी । आपण त्या भीतरीं । रिंगतीसे ॥१००॥
रुप नाही भर्तारा । ते चालवी घरचारा । ह्मणौनि हे कुमारा । कल्पादि होनि ॥१॥
ते योनि विण व्याली । गर्भेविण छाया आलि । सहज ते वांझोली । तर्हीं जगन्माता ॥२॥
हे गूढ नव्हे पाहे । वेदीं शास्त्रीं आहे । सिध्देशाचे सोये । सांपडैल ॥३॥
॥ इति माया गूढ विचारणा ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP