आदिखंड - देवत्रय
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
कपीलाचें प्रष्णगुणें । प्रलय निरुपीळा त्रिलोचने । हें अनागत तेणें । भाष्य केलें ॥४॥
कृपा करुनि गणाप्रति ।बोलें मुखें उमापति । या ब्रह्मांडाची उत्पत्ति । आह्मीं जाणूं ॥५॥
मिं या थूळा नंतरें । माया ब्रह्मीं अक्यत्वें उरें । तें हे ज्ञान साचोकारे । मज चि असे ॥६॥
आह्मी आनंदाचे अंश । ईशत्रय स्वयंप्रकाश । प्रकृति संगें साभास । होउं तेथें ॥७॥
निवडो पणव पदिं गुणें । पाठिं भूतकर्द्दमें येणें । सुंदरें रुपें सलक्षणें । प्रगट तिघैं ॥८॥
सृष्टी आदि देवत्रय । आह्मीं हे नमनु आश्चर्य । आमचे आधारें सर्व कार्य । सृष्टीचें चाले ॥९॥
आमतें देखति भेदु । तो सर्व मिथ्या वादु । असें बोले विश्वकंदु । आपुलें चि मुखें ॥११०॥
आमचे या प्रेमा पासुन । भेद देखतसे जन । कां जे आह्मीं परस्परें आपणया आपण । वंद्य असो ॥११॥
॥ इति देवत्रय ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP